Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

भारतातील सर्वात मोठ्या सागरी सेवा कंपनीची 1530 कोटींना डील

भारतातील सर्वात मोठ्या सागरी सेवा कंपनीची 1530 कोटींना डील

Image Source : www.quora.com

गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी हार्बर सर्व्हिसेस लिमिटेड (TAHSL) या कंपनीने सागरी सेवेतील ओशियन स्पार्कल लिमिटेड (OSL) कंपनीचा 100 टक्के ताबा घेण्यासाठी करार केला आहे.

अशियातील सर्वात श्रीमंत आणि जगातील श्रीमंतांच्या यादीतील सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या गौतम अदानी यांनी आणखी एका नवीन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. अदानी यांची मालकी असलेल्या अदानी हार्बर सर्व्हिसेस कंपनीने सागरी सेवा देणारी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी ओशियन स्पार्कल लिमिटेड (OSL) घेण्याचा करार केला आहे.

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) कंपनीने ओशियन स्पार्कल लिमिटेड या सागरी सेवा कंपनीचा 100 टक्के मालकी हिस्सा अदानी हार्बर सर्व्हिसेस लिमिटेड (TAHSL) या कंपनीमार्फत 1530 कोटी रूपयांना विकत घेतला. ओशियन स्पार्कल (OSL) ही कंपनी सागरी सेवा देणारी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी मानली जाते. अदानी समुहाने सागरी सेवा विभागात आपला हिस्सा वाढवण्याच्या उद्देशाने हा करार केला आहे. महिनाभरात हा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

भागधारकांना फायदा होणार

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी यांनी या कराराबद्दल बोलताना सांगितले की, दोन्ही कंपन्यांनी सामंजस्याने हा करार केला असून एकत्रित व्यवसायाद्वारे येत्या 5 वर्षात चांगल्या नफ्यासह कंपनीचे मूल्य दुप्पट होऊन त्याचा फायदा अदानी पोर्ट्सच्या भागधारकांना होईल.

ओशियन स्पार्कलचे मूल्य 1700 कोटी

ओशियन स्पार्कल लिमिटेड (OSL) कंपनीची स्थापना 1995 मध्ये सागरी तंत्रज्ञांच्या समुहाने  केली होती. याचे अध्यक्ष आणि MD म्हणून पी जयराज कुमार हे काम पाहत होते. इथून पुढे ते ओशियन स्पार्कल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. ओशियन स्पार्कल कंपनीचे मूल्य 1700 कोटी रूपये असून कंपनीची स्वत:च्या मालकीची 94 आणि भागीदारीत 94 जहाजे आहेत.

image source : https://bit.ly/3K4sIJZ