Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एप्रिल-मे मध्ये भारतातील हिरे, दागिने निर्यातीत 10 टक्क्यांनी वाढ!

एप्रिल-मे मध्ये भारतातील हिरे, दागिने निर्यातीत 10 टक्क्यांनी वाढ!

2022-23 या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यातच भारतातील हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्ये 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन महिन्यात या व्यावसायाने 51,050.53 कोटी रूपयांची निर्यात केली

भारतातील हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षातील पहिल्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यातच 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन महिन्यात या व्यावसायाने 51,050.53 कोटी रूपयांची निर्यात केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5.97 टक्क्यांनी वाढ झाली. 2021-22 या आर्थिक वर्षात याच कालावधीत 46,376.57 कोटी रूपयांची उलाढाल झाली होती.

जेम अण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल (GJEPC) यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे. सरकारने या क्षेत्राकडून 2022-23 या वर्षासाठी 45.7 बिलिअन डॉलरची निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे. याबाबत युएई आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी व्यापारी करार करण्यात आला असून या देशांकडून सर्वाधिक 17 टक्के निर्यातीची अपेक्षा आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी निर्यात काऊन्सिल बोर्ड या क्षेत्राच्या व्यापारी वृद्धीसाठी नवीन निर्यातदार शोधण्याच्या तयारीत आहे. 

मे 2022 मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 19.90 टक्क्यांनी वाढून 25,365.35 कोटी रूपये झाली. 2022 या वर्षातील एप्रिल आणि मे महिन्यात कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या श्रेणीनुसार निर्यातीत वार्षिक 4.42 टक्क्यांनी म्हणजेच 32601.84 कोटी रूपयांची वाढ झाली. तसेच या दोन महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत सुद्धा 27.11 टक्क्यांनी वाढ झाली. यात 10,897.84 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

युएईबरोबर झालेल्या आर्थिक करारामुळे 8 लाख कोटीची निर्यात अपेक्षित आहे. तसेच सरकार लवकरच कॅनडा, ब्रिटनआणि ऑस्ट्रेलियासोबत अशाच प्रकारचा करार करणार आहे. त्यामुळे हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे, असे जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष कॉलिन शाह यांनी सांगितले.

image source - https://bit.ly/3zIPeXz