Indian Railway : उन्हाळी सुट्टीला लवकरच सुरूवात होत आहे. या सुट्टीच्या निमित्ताने अनेकजण सहलीसाठी वा गावी जाण्याच्या उद्देशाने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. या सर्व प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता यावा म्हणून रेल्वे मंत्रालयाने विशेष निर्णय घेतला आहे.
रेल्वे मंत्रालयाचा प्रवाशांसाठी खास निर्णय
मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावी किंवा सहलीसाठी जायचे असेल तर आता निर्धास्त व्हा. कारण रेल्वे मंत्रालयाने या उन्हाळी दिवसांमध्ये रेल्वेच्या एकुण 4 हजार 10 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 210 गाड्या वापरल्या जाणार आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयामुळे प्रवाशांना जागेअभावी आपले नियोजन रद्द करावे लागणार नाही किंवा अधिकतर पैसे खर्च करून अन्य मार्गांनी प्रवास करावा लागणार नाही.
Indian Railways approves additional 4010 special trips to ensure smooth and comfortable travel for the passengers during this summer season
— PIB India (@PIB_India) April 11, 2023
Total 217 Special Trains will make 4010 Trips
Read here: https://t.co/KHm6BV0HQa pic.twitter.com/e0IProanoP
कोणत्या मार्गावर धावणार विशेष समर ट्रेन
रेल्वे मंत्रालयाकडून देशभरातील एकूण आठ रेल्वेमार्गावर ज्यादा गाड्या चालवण्यात येणार आहेत. सेंट्रल रेल्वे, ईस्टर्न रेल्वे, ईस्टर्न सेंट्रल रेल्वे, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे, साऊथ सेंट्रल रेल्वे, साऊथ वेस्टर्न रेल्वे, साऊथ रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे असे हे आठ मार्ग असतील. यापैकी सर्वाधिक गाड्या या साऊथ वेस्टर्न रेल्वे झोनमध्ये चालवण्यात येणार आहेत.
दरम्यान, या प्रवासावेळी रेल्वेच्या संपत्तीची नासधुस होणार नाही किंवा कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.