Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

import - export : निर्यात वाढतेय तरीही व्यापार तूट जास्त, जाणून घ्या काय आहे कारण

import - export

import - export : देशाची निर्यात वाढताना दिसत आहे. मात्र व्यापार तूटही जास्त असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँकेची नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होत आहे.

देशाची निर्यात वाढताना दिसत आहे. मात्र व्यापार तूटही जास्त असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँकेची नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होत आहे.

देशाची चालू खात्यावरील तूट सप्टेंबरअखेर तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) 4.4  टक्क्यांपर्यंत पोचलेली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीच्या तुलनेत 2.2 टक्क्यांच्या घरात असलेल्या तुटीत तिमाहीगणिक दुपटीने विस्तार झाला आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसून आलेले आहे. 

एकीकडे देशाची निर्यात वाढत आहे. मात्र असे असले तरी  आयातीत त्यापेक्षा अधिक वाढ होताना दिसत आहे. आणि या दोहोतील तफावत म्हणजेच  व्यापार तूट प्रत्येक महिन्यात  वाढत चालल्याचे दिसून येत आहे. परिणामी देशाच्या चालू खात्यावरील तूट विद्यमान आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत 36.4 अब्ज डॉलरवर म्हणजेच जीडीपीच्या 4.4  टक्के इतकी  पोहोचली आहे. 

ही तूट  पहिल्या तिमाहीत 18.2  अब्ज डॉलर अशी होती. तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीतील  तूट 9.7 अब्ज डॉलर म्हणजेच  जीडीपीच्या तुलनेत 1.3  टक्के इतकी होती.
फेब्रुवारी २०२२च्या दुसऱ्या पंधरवड्यात  रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. या आक्रमणानंतर जागतिक बाजारात वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्याचे दिसून आले. यातून  चालू खात्यातील तुटीमध्ये  वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. जुलै-सप्टेंबरमध्ये भारताचा एकूण आयात खर्च सुमारे 200 अब्ज डॉलरवर पोहोचलेला  आहे. या तिमाहीत वस्तू-व्यापार तूट 83.5  अब्ज डॉलरवर पोहोचलेली आहे. आधीच्या म्हणजे एप्रिल ते जून तिमाहीत ती 63 अब्ज डॉलरवर मर्यादित होती. वस्तू व्यापार तुटीतील या वाढीमुळे  चालू खात्यावरील तुटीत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.

सेवा क्षेत्राची कामगिरी चांगली 

सेवा क्षेत्रा ने चांगली कामगिरी केली आहे. सेवा क्षेत्राच्या निर्यातीने तूट कमी राखण्यास मदत केलेली दिसून येत आहे.  सॉफ्टवेअर, वित्तीय सेवा आणि पर्यटनाच्या क्षेत्रातील निर्यातीने सरासरी 30.2  टक्के इतकी वार्षिक वाढ केलेली आहे. अलीकडच्या  तिमाहीत या क्षेत्राचे 34.4 अब्ज डॉलर इतके योगदान राहिले..   गेल्या वर्षी म्हणजेच जुलै-सप्टेंबर 2021  या तिमाहीत ते 25.6  अब्ज डॉलर असे होते.