जगभरातील सर्वात मोठ्या 500 कंपन्यांची यादी हुरुन ग्लोबल संस्थेकडून प्रकाशित (Hurun Global 500 List 2022) करण्यात आली आहे. यावर्षीच्या यादीत भारताच्या वीस कंपन्यांचा समावेश झाला आहे. मागील वर्षी फक्त 12 कंपन्यांचा या यादीत समावेश होता. त्यात 8 कंपन्यांची भर पडली आहे. 20 कंपन्यासह भारत या यादीत 5 व्या स्थानावर आहे. रिलायन्स, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, अदानी समुह या काही भारतातील प्रमुख कंपन्यांची नावे या यादीत आहेत.
रिलायन्स, टीसीएस टॉप १०० मध्ये (Reliance, TCS in Top 100)
मागील वर्षी भारत या यादीत 9 व्या स्थानावर होता. भारतातील एकूण कंपन्यांपैकी 11 कंपन्या मुंबईतील, 4 अहमदाबाद तर दिल्ली, बंगळुरु आणि नोयडा, कोलकाता येथील प्रत्येकी एका कंपनीचा या यादीत समावेश आहे. रिलायन्स आणि टीसीएस जगभरातील टॉप 100 कंपनीच्या यादीत आल्या आहेत. 500 कंपन्यांच्या या यादीत समावेश झालेल्या भारतातील एकूण 20 कंपन्यांपैकी 202 बिलीयन डॉलर मूल्यासह रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 138 बिलीयन डॉलर मूल्य असलेली टाटा कंन्सलटन्सी कंपनी दुसऱ्या तर 97 बिलियन डॉलर मुल्यासह एचडीएफसी कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेच्या 260 कंपन्यांचा समावेश (260 companies from USA)
या पाचशे कंपन्यामध्ये अमेरिकेच्या सर्वाधिक 260 कंपन्यांचा समावेश आहे. म्हणजे सुमारे 52 टक्के कंपन्या अमेरिकेतील आहेत. त्यानंतर 35 कंपन्यासह चीन दुसऱ्या तर 12 कंपन्यांसह जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. युनायटेड किंगडममधील 21 कंपन्यांचा समावेश या यादीत असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत.
जगभरातील टॉप 5 कंपन्या
कंपनीचे नाव | मूल्य |
अॅपल | 2.36 ट्रिलियन डॉलर |
मायक्रोसॉफ्ट | 1.8 ट्रिलियन डॉलर |
अल्फाबेट | 1.3 ट्रिलियन डॉलर |
अॅमेझॉन | 1.2 ट्रिलियन डॉलर |
टेस्ला | 672 बिलियन डॉलर |
अदानी समुहाच्या चार कंपन्यांचा समावेश (4 companies from Adani group)
अदानी ट्रान्समिशन,अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्राइजेस आणि अदानी गॅस या चार कंपन्यांचा यादीत समावेश आहे. या चारही कंपन्यांचे एकूण मूल्य 173 बिलियन डॉलर इतके आहे.