An Apple a Day Keeps the Doctor Away ही म्हण तुम्हाला ठाऊकच असेल. एक सफरचंद रोज खाल्लं तर तुमचं शरीर निरोगी ठेवता येतं. आणि तुम्हाला डॉक्टरची गरज पडत नाही, अशा आशयाची ही म्हण आहे. भारतीय बाजारपेठांमध्ये सफरचंद सर्रास उपलब्ध आहेत. पण, ही संफरचंद कदाचित इराणमधून आलेली असू शकतील.
प्रगत आणि पाश्चात्य देशांमध्ये सफरचंद हे पौष्टिक फळ म्हणून ओळखलं जातं. आणि त्याचं उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होतं. भारतात मात्र जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येच सफरचंदांची लागवड जास्त प्रमाणात होते. 1990 पर्यंत भारत सफरचंदांची आयात फारशी करत नव्हता. पण, तिथून पुढे अगदी युरोपातून पोलंडमधून तर अमेरिका खंडातील चिलीमधूनही सफरचंदांची आवक भारतात सुरू झाली.
त्यानंतरच्या टप्प्यात 2000च्या शतकात भारतात इराणमधून आलेल्या सफरचंदांनी बाजारपेठ काबीज केली आहे. आताही 2023-24 या आर्थिक वर्षांत देशात 4,30,000 टन सफरचंद इराणमधून येतील असा अंदाज आहे. सफरचंद आयातीच्या बाबतीत आता इराणने भारतात इतर देशांना जवळ जवळ मागे टाकलं आहे. भारतात येणाऱ्या सफरचंदाच्या 23% फळ हे इराणमधून येतं.
पण, यामध्ये एक मेख आहे. इराणमधून भारतात येणारी सफरचंद ही अफगाणिस्तान मार्गे देशात येतायत. आणि दक्षिण आशियाई सात देशांचा एकमेकांशी व्यापारी सामंजस्य करार आहे. या देशांमधून भारतात येणाऱ्या कृषि वस्तूंवर आयात करात सवलत मिळते. या कराराला दक्षिण आशियाई व्यापार करार (South Asia Trade Agreement) असं म्हणतात. आणि इराण या सवलतीचा गैरफायदा घेत असल्याचा भारतीय सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांचा दावा आहे. इराणची सफरचंद अफगाणिस्तान मार्गे भारतात आली की त्यांना आयात शुल्कात सवलत मिळते. ज्यामुळे भारतात तयार झालेल्या सफरचंदांचा दर क्विंटल मागे 9500 रुपये असताना इराणची सफरचंद 8000-8500 प्रती क्विंटल या दराने उपलब्ध होतात.
आणि या दराशी स्पर्धा करणं भारतीय उत्पादकांना शक्य होत नाहीए. यामुळे देशांतर्गत सफरचंद उत्पादक संघटनांनी हा गैरप्रकार थांबवावा यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. अफगाणिस्तानमधून रस्ता मार्गे होणारी सफरचंदांची वाहतूक अडवण्याचा प्रयत्नही या संघटनांनी केला.
भारतातलं सफरचंद उत्पादन दरवर्षी सरासरी साडेतीन लाख मेट्रिक टनांचं आहे. तर भारतात बाहेरून दरवर्षी सरासरी 4 लाख 36 हजार मेट्रिक टन सफरचंद आयात केली जातात. यात इराण खालोखाल तुर्कीये म्हणून ती आयात केली जातात.
सफरचंद ही कोल्ड स्टोरेजमध्ये जास्त काळ टिकून राहू शकतात. आणि लवकर खराबही होत नाहीत. त्यामुळे फळांच्या निर्यातीमध्ये सफरचंदांच्या आयात-निर्यातीचं प्रमाण जगभरातच जास्त आहे. पण, भारतात सध्या अशी परिस्थिती उद्भवलीय की, देशांतर्गत सफरचंद कोल्ड स्टोरेजमध्ये अडकून आहे. आणि इराणच्या सफरचंदाला उठाव दिसतोय.