Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Orange Farming, Planting, Growing and Marketing : ग्राहकांपर्यंत कसा पोहचतो संत्रा, जाणून घ्या

Orange Farming, Planting, Growing

Orange Farming, Planting, Growing : तुमच्या हातात येणारा टवटवीत संत्रा, टवटवीत दिसण्यासाठी त्यावर काय संस्कार केले जातात, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो. अनेक राज्यांमधल्या अनेक शहरांना वैविध्यपूर्ण अशी नावे आहेत जसे राजस्थानमधील जयपूरला ‘पिंक सिटी’ म्हणून संबोधले जाते  तसे  महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि वरुड हे शहर ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळखले जाते. उत्पादन हे नागपूर जवळील आजूबाजूच्या भागामध्ये होते. आपण फक्त तयार झालेला संत्रा  बघितला, पण तो तयार होण्यामागे शेतकऱ्यांना किती कष्ट आहे याचा आपण विचारही करू शकत नाही. संत्रा शेतकऱ्यांपासून व्यापऱ्यांपर्यंत कसा पोहचतो ती प्रोसेस जाणून घ्या या लेखातून. 

पनेरी Paneri

sowing

संत्रा लागवड करण्यासाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे 'पनेरी'. संत्राचे बिज लावून जे रोप तयार होते त्याला पनेरी म्हणतात. पनेरी खूप दुर्मिळ असते. ती सहज मिळत नाही.  संत्राची लागवड करणारे सर्वजण संत्राचे बीज लावत नाही तर ते पनेरी विकत घेऊन त्याची लागवड करतात. अमरावती जिल्ह्यातील शेघाट या गावामध्ये सर्वाधिक पनेरीचे उत्पादन घेतले जाते. वेगवेगळ्या राज्यात तेथून माल पुरवला जातो. पनेरीचे एक रोप 15 रुपये प्रती नग या दराने विकले जाते. 

संत्राच्या झाडांची लागवड (Plantation of Orange Trees)

 संत्राच्या झाडांची  लागवड दोन पद्धतीने करू शकतो सर्वात जास्त वापरली जाणारी  जी पद्धत आहे ती म्हणजे  सपाट जमिनीवरती आपण 6/6 मीटर अंतरावरती खोदून  लागवड करतो. तर दुसरी पद्धत म्हणजे,  त्याच्यामध्ये उंच बेड म्हणजे त्याला आपण गादीवाफे (mattress steam)सुद्धा म्हणू शकतो. साधारणता गादीवाफाचे मूळ आहे ते तीन मीटर रुंदीचे  आणि 50 सेंटीमीटर उंचीचे अशा प्रकारचे गादी वाफ्यावरती आपण 6/3 मीटर अंतरावरती लागवड केली जाते. लागवडीनंतर महत्त्वाच्या बाबी म्हणजे त्याला झाडाला आधार देणे, झाडाला वळण देणे, झाडाची योग्य छाटणी करणे त्याचे पाण्याची नियोजन करणे रोगांपासून संरक्षण करणे हे आहे. आता तयार केलेले बाग 25 ते 30 वर्षापर्यंत राहतील आणि त्या झाडाचं अंतर आपण 6/6  मीटर ठेवलेल आहे तर या झाडाचा आपल्याला विस्तार करणे सुद्धा आवश्यक आहे. आपण मुळातच लहानपणापासून जर त्याला वळण जर व्यवस्थित लावत गेलो तर फांद्यांची वाढ चांगली होईल झाडाचा विस्तार चांगला वेळ त्यावेळी उत्पादन सुद्धा मिळेल. 

पाच वर्ष झाडांची काळजी (Caring for trees for Five years)

पाच वर्षानी त्या झाडांना फळ येण्यास सुरवात होते. त्या फळांना सुद्धा अनेक रोगांचा, नैसर्गिक आपत्तीचा (natural disaster)सामना करावा लागतो. कधी कधी झाडांची पाने पिवळी पडताना दिसतात त्यामागचे कारण म्हणजे  तापमानातील बदल आणि पाण्याचा ताण ही प्रमुख कारणे. पाण्याचा अतिरिक्त ताण बसल्यास झाडांची प्रकाश संश्लेषणाची (Photosynthesis) क्रिया मंदावते. परिणामी अन्नद्रव्यांचा पुरेसा पुरवठा पानांना होत नाही यामुळे झाडात कर्बोदकांचा (carbohydrates)पुरवठा कमी होतो पानात हरितद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन ती पिवळी पडतात, यावस्थेला ‘क्लोरोसिस’ (Chlorosis)असं म्हटलं जातं. झाडाचा काही भाग पिवळा पडल्याचे दिसत असतानाच पिवळ्या पडलेल्या फांद्यांवर काळे पुटकुळे दिसू लागतात या अवस्थेला  ‘शेंडेमर’ म्हणतात. संत्र्याची पाने पिवळी पडू लागल्यास या दोन्ही रोगांची लागण होण्याची शक्यता असते.  संत्र्याची लागवड करताना योग्य काळजी न घेतल्यास पानं पिवळी पडतात जुन्या बागेत त्याच खड्ड्यात रोपांची लागवड करायची असल्यास मातीचा निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. तसे  न केल्यास रोगांचा प्रादुर्भाव (Outbreak of diseases) झपाट्याने वाढतो. संत्रा लागवड केलेल्या जमिनीत चुनखडीच प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. कॅल्शियम आणि झिंक (Calcium and Zinc)अशा अन्नद्रव्यांची कमतरता भासते त्यामुळे संत्र्याची पाने पिवळी पडून ती गळू लागतात. झाडांना पाच वर्ष खूप जपावे लागते. शेणखत, रासायनिक खत, फवारणी योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात दिल्यास पाच वर्षात फळ येतात. 

बहर blossom

संत्राला वर्षभरात दोन बहर येतात. एक म्हणजे आंबिया बहर, जो ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात असतो. हा बहर झाडांना खत पाणी घालून स्वतः घेता येतो. दूसरा म्हणजे मृग बहर. हा बहर फेब्रुवारी ते मे या कालावधीत असतो. हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतो, आपल्याला घेत येत नाही. 

विक्री आणि वॅक्सिन Sales and Vaccines

शेतात माल आल्यानंतर शेतकरी त्याला बांबूच्या सहाय्याने बांधून आधार देतात. संत्रा विक्रीसाठी काढल्यानंतर व्यापारी त्याला करंट रेटमध्ये (करंट रेट) खरेदी करतात. त्यामध्ये तीन भाग होतात, सर्वात चांगल्या क्वालिटीचा, मध्यम क्वालिटीचा, बारीक राहलेला या तीन भागाचे रेटही तीन प्रकारे देतात. उदा. एक नंबर संत्रा जर 25000 रुपये टन असेल, तर दोन नंबर  संत्रा 23000 रुपये आणि सर्वात बारीक 21000 रुपये याप्रमाणे भाव देवून खरेदी करतात. व्यापारी बाजारपेठेमध्ये हाच  संत्रा 30000 रुपये टन असा विकतो. बाजारपेठेत जाण्याआधी संत्राला वॅक्सिन केले जाते. पॉलिश करून मालाची छाटणी केली जाते, त्यानंतर बाजारपेठेत ग्राहकांना विकल्या जातो. 

ऑरेंज ज्यूस, कॅन्डी व्यावसायिक Orange juice, candy

 संत्रा उत्पादनाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये कोणालाही होत नाही, तितका फायदा या उत्पादकांना होतो. संत्राच्या सीजनमध्ये संत्रा आणि सीजन संपला की सर्वत्र ऑरेंज ज्यूस, कॅन्डी वापरली जाते. बहुतांश  लोकांचा आवडता फ्लेवर असल्याने  संत्राला पाहिजे तशी  मागणी नेहमी असते. उदा. एक ज्यूसचे पॅक 143 रुपयाला मिळते. त्यात 3  संत्राचा ज्यूस असणार, आणि  संत्रा 30 रुपये किलो तर यावर किती प्रॉफिट व्यावसायिकाला मिळत याचा अंदाज लागतो. 

सर्वाधिक नफा कोणाला? 

पनेरी विक्री 

15 रु.  प्रति नग 

व्यापाऱ्याला संत्रा विक्री 

25 रु. प्रति किलो 

ग्राहकांना संत्रा विक्री 

 30 रु. प्रति किलो

ऑरेंज ज्युस विक्री 

145 रु  प्रति लिटर