जर तुम्ही चालू वर्षात, म्हणजेच 2023 मध्ये घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमची चिंता वाढवू शकते.घर बांधण्यापूर्वी जर तुम्ही तुमचे बजेट बनवले असेल तर त्यात आवश्यक वाढ करावी लागणार आहे. याचे कारण असे की घर बांधण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक, लोखंडाच्या किमतीत वाढ झाली आहे. देशाच्या जवळपास सर्वच राज्यांत लोखंडाची ही दरवाढ दिसून आली आहे. गेल्या आठवडाभरापासून लोखंडाच्या किंमतीत वाढ बघायला मिळते आहे.
Table of contents [Show]
भाववाढ तेजीत!
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच, जानेवारीमध्येच लोखंडाच्या किमतीत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. आता मात्र प्रत्यक्षात भाववाढ पाहायला मिळते आहे. जर तुम्ही या वर्षी घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुमचा खर्च वाढणार आहे हे लक्षात ठेवा. सुमारे 500 ते 1000 रुपयांपर्यंत लोखंडाच्या दरात वाढ झाली आहे.
रोज बदलतायेत भाव!
लोखंडी गजाच्या किमती दररोज बदलताना दिसत आहेत. सध्या दिल्लीत 55,200 रुपये प्रति टन या दराने लोखंडी गजाची विक्री सुरू आहे.तसे पाहायला गेले तर 2022 च्या तुलनेत सध्या किमती कमी आहेत. मागील वर्षात सुमारे 78,800 रुपये प्रति टनपर्यंत लोखंडी गजाची विक्री नोंदवली गेली होती.
देशातील विविध भागांत लोखंडाच्या किमती
- रायगड - 51,500 रुपये प्रति टन
- नागपूर - 52,500 रुपये प्रति टन
- हैदराबाद - 54,000 रुपये प्रति टन
- जयपूर - रु 55,100 प्रति टन
- गाझियाबाद - 54,900 रुपये प्रति टन
- इंदौर- 54,800 रुपये प्रति टन
- चेन्नई - 54,000 रुपये प्रति टन
- मुंबई - 57,000 रुपये प्रति टन
- कानपूर - 57,500 रुपये प्रति टन
तुमच्या शहरातील लोखंडाचे दर कसे तपासाल?
तुमच्या शहरातील लोखंडी गजाच्या किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही ironmart.com किंवा ayronmart.com या वेबसाईटला भेट देऊ शकता. सरकारकडून बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी गजावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. वर नमूद केलेल्या किमतींमध्ये GST समाविष्ट नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.