इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) प्रकारातील काही स्कीमने 2022 मध्ये सरासरी 4.34 टक्के इतका परतावा दिला. तर काही स्कीमने बेंचमार्क निर्देशांकापेक्षा कमी परतावा दिला आहे. त्यामुळे टॅक्स सेव्हिंग प्रकारातील तुमची गुंतवणूक कमी करण्याची घाई करू नका, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
2022 मध्ये एकूण 15.98 टक्क्यांच्या परताव्यासह क्वांट टॅक्स प्लॅन फंड हा अव्वल स्थानी होता. त्यानंतर एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंड दुसऱ्या क्रमांकावर होता. एचडीएफसी फंडाने 12.86 टक्के परतावा दिला. तर निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर फंडाने 9.33 टक्क्यांच्या परताव्यासह या यादीत तिसरे स्थान मिळवले. तर कोटक टॅक्स सेव्हर फंडाने सुमारे 9.11 टक्के परतावा दिला.
याचबरोबर 2022 मध्ये काही टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडांनी अपेक्षेपेक्षा कमी परतावा दिला. यामध्ये अक्सिस लॉँग टर्म इक्विटी फंडने 9.96 टक्के, इन्व्हेसको इंडिया टॅक्स प्लॅनने 5.15 टक्के आणि एचएसबीसी ईएलएसएस फंडमध्ये 0.55 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.
आयआयएफएल निफ्टी 50 टॅक्स सेव्हर इंडेक्स फंड!
ईएलएसएस प्रकारातील आयआयएफएल ईएलएसएस निफ्टी 50 टॅक्स सेव्हर इंडेक्स फंड आहे. या योजनेचा एनएफओ ओपन असून 21 डिसेंबरपर्यंत हा गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत ईएलएसएस प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये 6,932.21 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. गेल्यावर्षी ईएलएसएस फंडमध्ये 3,291.83 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
2022 मधील टॉप ईएलएसएस म्युच्युअल फंड्स | |
स्कीमचे नाव | वार्षिक परतावा (टक्के) |
क्वॉन्ट टॅक्स प्लॅन | 15.98 |
एचडीएफसी टॅक्स सेव्हर | 12.86 |
निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर फंड | 9.33 |
कोटक टॅक्स सेव्हर फंड | 9.11 |
फ्रॅन्कलिन इंडिया टॅक्सशिल्ड | 8.23 |
टाऊरस टॅक्स शिल्ड फंड | 7.76 |
सुंदरम टॅक्स सेव्हिंग फंड | 7.08 |
पराग पारीख टॅक्स सेव्हर फंड | 6.92 |
डीएसपी टॅक्स सेव्हर फंड | 6.48 |
पीजीआयएम इंडिया ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड | 6.28 |
2022 मध्ये वाईट कामगिरी करणारे ईएलएसएस म्युच्युअल फंड | |
योजनेचे नाव | वार्षिक परतावा (टक्के) |
अक्सिस लॉंग टर्म इक्विटी फंड | -9.96 |
इन्व्हेसको इंडिया टॅक्स प्लॅन | -5.15 |
एचएसबीसी ईएलएसएस फंड | -0.55 |
Source: economicstimes.indiatimes.com