Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Relief for Senior Citizens: या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी बातमी, आयकर भरावा लागणार नाही!

Income Tax relief for Senior Citizens:

Income tax exemption for senior citizens: जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी नुकतीच केंद्र सरकारने दिली. आता जेष्ठ नागरिकांना आयकर भरण्यात सूट मिळाली आहे, पण ही सूट नेमकी कोणत्या वयोगटातील जेष्ठ नागरिकांना लागू होते, त्याचे इतर निकष काय आहेत, ते बातमीतून समजून घ्या.

ITR For Senior Citizens: देशात ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने, नुकतेच आयकर रिटर्नमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी एक आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता त्यांनी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प-2023 पूर्वी, सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीसाठी प्राप्तिकर रिटर्नचे नियम बदलले आहेत. देशातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे बँक पेन्शन खाते आहे आणि बँक खात्यावरील व्याज हेच त्यांचे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. अशा नागरिकांना आता आयकर (ITR: Income Tax Return) भरावा लागणार नाही आहे.

अर्थ मंत्रालयाचे ट्विट (What the Ministry of Finance tweeted)-

अर्थ मंत्रालयाने नुकतेच आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे केवळ बँक पेन्शन खाते आहे आणि त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत म्हणून बँक खात्यावरील व्याज आहे, त्यांना आता आयकर भरण्याची आवश्यकता नाही. यासाठी आयकर कायदा-1961 मधील कलम 194-पी हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आले आहे. हे कलम एप्रिल 2021 पासून लागू आहे. मात्र, आता यातील काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. ज्याबाबत बँकांना माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाद्वारे (Central Board of Direct Taxes), हे कलम कार्यान्वित करण्यात आले आहे. यासाठी संबंधित फॉर्म आणि अटींबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासोबतच नियम 31, नियम 31(अ), फॉर्म 16 आणि 24(क्यू) मध्ये आवश्यक सुधारणाही करण्यात आल्या आहेत.

अर्थमंत्री काय म्हणाल्या (What did the Finance Minister say?)-

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) म्हणाल्या होत्या की, आता आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्षात आहोत, आम्ही उत्साहाने आमचा प्रवास सुरू ठेवत आहोत आणि पुढेही ठेवू. या वर्षात,  देशातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांवरील कर अनुपालनाचे (Tax Compliance) ओझे आम्ही कमी करणार आहोत. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न पेन्शन आणि व्याजातून येते, त्यांना आयकर (Income Tax Return File) भरण्यापासून सूट देण्याचा आमचा प्रस्ताव आहे. ज्या बँकेत त्याचे खाते आहे, ती बँक त्याच्या उत्पन्नावर देय असलेला तेवढाच कर कापून घेईल.