Income Tax Free State: काही दिवसांमध्ये भारताचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. येत्या अर्थसंकल्पात दिलासादायक गोष्ट काय असेल याकडे मध्यमवर्गीयांचे लक्ष लागून आहे. Tax Slab वाढणार की नाही याबद्दल अनेकजण चिंतीत आहेत. कमाईचा पैसा टॅक्स रुपात सरकार जमा होऊ नये म्हणून अनेक लोक टॅक्स फ्री गुंतवणूकीला (Tax Free Investment) प्राधान्य देतात. परंतु भारतात असे एक राज्य आहे जिथले लोक एक पैसा देखील टॅक्स देत नाहीत. काय? दचकलात ना? होय, हे खरं आहे!
(Tax exemption laws in Sikkim) भारतातील सिक्कीम हे एक असे राज्य आहे जिथल्या लोकांना त्यांच्या कमाईवर एक रुपया देखील टॅक्स द्यायची गरज नाही. त्यामुळे Tax Slab वाढला की कमी झाला याची सिक्कीमच्या नागरिकांना चिंता नसते.
Table of contents [Show]
कोण घेऊ शकतात या सुविधेचा फायदा?
जे लोक सिक्कीमचे रहिवासी आहेत, केवळ आणि केवळ त्यांच्यासाठीच ही सुविधा आयकर विभागाने पर्यायाने भारत सरकारने देऊ केली आहे. सिक्कीममध्ये स्थलांतरित झालेले लोक किंवा सिक्कीममधील मुलीशी लग्न केलेला व्यक्ती या सुविधेचा फायदा घेऊ शकत नाही.
का आहे Sikkim Tax Haven?
सिक्कीमला करमुक्तीचा स्वर्ग देखील म्हटलं जातं. 1975 साली सिक्कीम भारतात विलीन झाले. याआधी सिक्कीम हे स्वतंत्र राष्ट्र होते. भारतात विलीन होण्यासाठी सिक्कीमला जेव्हा प्रस्ताव दिला गेला तेव्हा एका अटीवर सिक्कीमने विलीनीकरण करण्याचे ठरवले. ही अट होती कर माफीची!1975 च्या अगोदरपासून सिक्कीमचे रहिवासी असलेले लोक कर मुक्त असतील अशी घोषणा भारत सरकारने केली. 1989 मध्ये भारत सरकारने पुन्हा एकदा सिक्कीमवर कर लावला, परंतु सिक्कीमच्या रहिवाशांनी सातत्याने याचा विरोध केला. 2008 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी IT Act 1961 च्या Section 10 मध्ये सुधारणा करत पुन्हा एकदा सिक्कीमच्या जनतेला करमुक्त केले.
कशी दिली जाते कर मुक्तता?
सिक्कीममधील रहिवासी जर सिक्कीममध्येच काम करत असतील तरच त्यांना ही सवलत घेता येते. सिक्कीमचे रहिवासी राज्याबाहेर जर कामानिमित्त गेले असतील आणि पैसे कमवत असतील तर त्यांना टॅक्स हा भरावाच लागतो.
पॅन कार्ड नोंदणी आवश्यक नाही!
सिक्कीम राज्यात राहणाऱ्या आणि तिथेच रोजगार करणाऱ्या नागरिकांना बँक खात्यांशी पॅनकार्ड जोडणी करणे बंधनकारक नाही.परंतु Crypto Currency च्या कमाईवर सिक्कीमच्या रहिवाशांना कर भरावाच लागतो.