Sago/Peanuts Rate: महाशिवरात्रीला अनेक शिवभक्त उपवास धरतात. त्यामुळे साबुदाण्याची मागणी वाढते. मागणी वाढली आणि आवक जर कमी असेल तर कोणत्याही वस्तूच्या दरात वाढ होते. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी साबूदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात क्विंटल मागे 1000 ते 1500 रुपयांनी वाढ झाली आहे. शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर साबूदाणा आणि शेंगदाणे महाग झालेत आणि भगर मात्र स्थिर आहे.
Table of contents [Show]
साबूदाणा, शेंगदाणे, भगर याची आवक कुठून होते? (Where does sago, peanuts, bhagar come from?)
साबुदाणा | तामिळनाडू |
शेंगदाणा | कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात |
भगर | नाशिक |
दरवर्षी जून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत शेंगदाण्याला भरपूर मागणी असते. घरगुती ग्राहक तसेच हाॅटेल व्यावसायिकांकडून शेंगदाणा तेलाचा वापर केला जातो. शेंगदाण्याला मागणी वाढल्याने दरात वाढ झाली असल्याचे व्यापारी नितीन चोरडिया यांनी सांगितले.
भगरीला तृणधान्य घोषित करण्यात आले त्यामुळे भगरीच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बाजारात भगर, साबुदाण्याची आवक बऱ्यापैकी होत आहे. साबुदाण्याच्या दरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांकडून समजले आहे.
साबुदाणा कशापासून बनवला जातो? (What is sago made from?)
साबुदाणा ही झाडावर उगवणारी गोष्ट नाही, तर ती बनवली जाते आणि ती बनवण्याची प्रक्रिया खूप लांब असते. हे सागो पाम नावाच्या झाडापासून बनवले जाते. साबुदाण्याची पहिली पाम अमेरिकेत सापडली. तेथून ते आफ्रिकेत पोहोचले. 19 व्या शतकानंतर ते भारतात आले. दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये याची लागवड केली जाते.
साबुदाणा कसा तयार होतो? (How is sago prepared?)
साबुदाणा तयार करण्यासाठी, तळहाताच्या साबुदाण्याच्या देठाच्या मध्यभागी टॅपिओका रूट काढला जातो, त्याला कसावा देखील म्हणतात. कसावा रताळ्यासारखाच दिसतो. तो कापून मोठ्या भांड्यात ठेवला जातो आणि त्यात रोज पाणी टाकले जाते. ही प्रक्रिया बर्याच काळासाठी पुनरावृत्ती होते. मग वेगवेगळ्या आकाराचा साबुदाणा तयार करून त्याचा लगदा मशिनमध्ये टाकून तो वाळवला जातो. वाळल्यानंतर त्यात ग्लुकोज आणि स्टार्चची पावडर पॉलिश केली जाते. त्यामुळे साबुदाणा चमकतो आणि पांढर्या चमकदार गोळ्यांसारखा दिसू लागतो. त्यानंतर ते बाजारात आणले जाते.
किरकोळ बाजारातील किलोचा दर (Rate per kg in retail market)
घुंगरू शेंगदाणा | 110 ते 130 |
स्पॅनिश शेंगदाणा | 130 ते 140 |
भगर | 120 ते 135 |
साबुदाणा | 85 ते 90 |
साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या उत्पादनात यावर्षी घट झाल्याचे समजते. हवामानातील बदलांमुळे उत्पादनात घट झाली असावी असा अंदाज कृषी तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. शेंगदाण्याचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. नवीन शेंगदाण्याची आवक लवकरच होणार आहे. मागणीच्या तुलनेत शेंगदाणा आणि साबूदाणा कमी असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे भाववाढ होत असल्याचे म्हटले जात आहे.