Budget 2023 Update: आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शिक्षण व्यवस्थेसंबंधी मोठी घोषणा केली आहे. अर्थसंकल्प 2023-24 नुसार, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 740 एकलव्य मॉडेल शाळांसाठी पुढील तीन वर्षात 38,800 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरी मिळणार असल्याची घोषणा केली. तसेच आदिवासी मुलांच्या शिक्षणावरदेखील जोर देणार आहे.
अर्थसंकल्प 2023-24 सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, सध्या शिक्षण व्यवस्थेत खूप मोठा बदल होत आहे. म्हणून या शिक्षण क्षेत्राला एक नवीन दिशा मिळावी यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 740 एकलव्य मॉडेल शाळांसाठी पुढील तीन वर्षात 38,800 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनासारख्या महामारीमुळे शिक्षण व्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शिक्षण संबंधी बदल करण्याचे खूप मोठे आव्हान शिक्षण व्यवस्थेसमोर आहे. तसेच देशातील अनेक शाळेत आजही शिक्षकांचा अभाव आहे. आदिवासी भागात तर अजून ही शिक्षक नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर जोर देणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले.