Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IT Sector: दोन वर्षात ‘आयटी’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अडीच लाख नोकऱ्या गेल्या

IT Jobs

Image Source : www.scroll.in

IT Sector: महामंदीचा फटका आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरवात झाली आहे. ‘आयटी(IT)’ क्षेत्रही यापासून वाचू शकले नाही.

IT Sector: संपूर्ण जगाला महामंदीचा फटका बसण्यास सुरवात झाली आहे. सर्व मोठमोठ्या कंपन्यांनी नोकर कपात(Employee reduction) करायला सुरवात केली आहे. अमेरिकेत(America) यावर्षी फार माेठ्या प्रमाणात नाेकर  कपात(Employee reduction) सुरू झाली आहे. 2008 - 09 साली आलेल्या महामंदीत जेवढी कर्मचारी कपात झाली होती, त्यापेक्षा अधिक कर्मचारी कपात यंदा झाल्याचे दिसून आले आहे. 2023 मध्ये ही परिस्थिती आणखी विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘मार्केटवॉच’च्या(MarketWatch Report) अहवालानुसार, 2023 आणि त्यापुढे टिकून राहण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्या कर्मचारी कपात करणार आहेत. जागतिक प्लेसमेंट संस्था ‘चॅलेंजर, ग्रे अँड ख्रिसमस’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2023 हे वर्ष सर्वाधिक वाईट असण्याची शक्यता वर्तवली आहे. ॲमेझाॅन(Amazon) आणि एचपी आयएनसी(HP INC) यांनी भविष्यात एकापाठोपाठ एक 20,000 व 6000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी सुरु केली आहे.तर दुसरीकडे मेटाने(Meta) जगभरातील 4000 कर्मचाऱ्यांना काढण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. गुगलनेही(Google) मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळॆ आतापर्यंत सुरक्षित नोकरी मानल्या जाणाऱ्या आयटी(IT) क्षेत्रात मोठी महामंदी सुरु झाली आहे.

अमेरिकेत आणि भारतात याचे काय पडसाद उमटले?

नोव्हेंबरमध्ये(Nov) अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी 73,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले असून सामूहिक कर्मचारी कपातीच्या स्वरूपात ही कारवाई करण्यात आली. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये  मेटा, ट्विटर, सेल्सफोर्स, नेटफ्लिक्स, सिस्को, रोकू आणि अन्य कंपन्यांचा समावेश आहे. भारतात 17,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी कामावरून 
काढून टाकले आहे.

भारतातील केंद्रीय अर्थमंत्र्यांचे म्हणणे काय?

पश्चिमेकडील देशांवर मंदीचे सावट असताना बहुराष्ट्रीय कंपन्या भारताकडे आकर्षित झाल्या आहेत. अशावेळी उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना भारतात आणाण्यासाठी देशातील उद्याेग विश्वाने रणनीती आखायला हवी, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण(Nirmala Sitharaman) यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

1.5 लाख कर्मचाऱ्यांची कपात

2008-09 या काळातील महामंदीच्या पातळीपेक्षा 2022 मध्ये प्रमुख 965 तंत्रज्ञान कंपन्यांनी 1,50,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये  मेटा, ट्विटर, सेल्सफोर्स, नेटफ्लिक्स, सिस्को, रोकू आणि अन्य कंपन्यांचा समावेश आहे. भारतातील इन्फोसिस, टीसीएस, विप्रो यासारख्या अनेक कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.