Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IMPS Rule: IMPS च्या माध्यमातून पैसे पाठवण्याच्या नियमात मोठा बदल, पाहा डिटेल्स

Online Payment

Image Source : https://www.freepik.com/

NPCI ने IMPS च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता ग्राहक केवळ मोबाइल नंबर व बँकेचे नाव नोंदवून पैसे पाठवू शकतील.

स्मार्टफोन व इंटरनेटमुळे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणे खूपच सोपे झाले आहे. अगदी काही मिनिटांमध्ये कोणालाही सहज पाठवता येतात. मात्र, असे असले तरीही तुमच्याकडे ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीचा बँक खाते नंबर, बँकेचे नाव, आयएफएससी कोड इत्यादी माहिती असणे गरजेची असते. प्रामुख्याने IMPS च्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार करताना संपूर्ण माहिती गरजेची असते. 

मात्र, आता National Payments Corporation of India (NPCI) ने IMPS च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांच्या नियमात बदल केला आहे. नवीन नियमांमुळे ग्राहकांना पैसे पाठवणे सोपे होणार आहे. IMPS चे नवीन नियम काय आहेत? त्याबाबत जाणून घेऊयात.

IMPS च्या माध्यमातून पैसे पाठवण्याचा नवीन नियम काय?  

आतापर्यंत IMPS च्या माध्यमातून पैसे पाठवताना बँक खाते नंबर, व्यक्तीचे नाव आणि आयएफएससी कोड इत्यादी माहिती द्यावी लागायची. मात्र, NPCI ने नवीन मार्गदर्शक सुचना जारी करत पैसे पाठवण्याच्या नियमात बदल केला आहे. 1 फेब्रुवारीपासून IMPS च्या माध्यमातून पैसे पाठवताना केवळ व्यक्तीचा मोबाइल नंबर आणि बँकेचे नाव माहित असणे गरजेचे आहे. इतर माहित नसली तरीही तुम्ही सहज 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाठवू शकता. त्वरित पैसे पाठविण्यासाठी याचा फायदा होईल.

त्वरित पैसे पाठविण्यासाठी वापरा IMPS

तुम्ही ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी यूपीआयचा वापर करत असाल. परंतु, 5 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी IMPS (Immediate Payment Service) चा वापर करू शकता. ही 24x7 त्वरित देशांतर्गत पैसे पाठविण्याची सुविधा प्रदान करणारी पेमेंट सिस्टिम आहे. तुम्ही इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग अ‍ॅप, एटीएम, एसएमएस आणि IVRS च्या माध्यमातून IMPS वापरू शकता. आतापर्यंत IMPS P2A (अकाउंट + IFSC) अथवा P2P (मोबाइल नंबर + MMID) ट्रान्सफर मोडच्या माध्यमातून व्यवहार पूर्ण होत असे. मात्र, नवीन नियमांमुळे केवळ मोबाइल नंबर+बँकेचे नाव नोंदवून व्यवहार पूर्ण करता येईल.

IMPS च्या माध्यमातून पैसे कसे पाठवाल?

  • सर्वात प्रथम तुमच्या फोनमध्ये बँकिंग अ‍ॅप उघडा.
  • आता होम पेजवरील 'Fund Transfer' पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर पैसे ज्या माध्यमातून पाठवायचे तो पर्याय निवडू शकता. येथे 'IMPS' हा पर्याय निवडा.
  • आता ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे, त्याचा मोबाइल नंबर व संबंधित बँकेचे नाव टाका. येथे तुम्हाला बँक खाते नंबर अथवा IFSC बाबत माहिती देण्याची गरज नाही.
  • आता तुम्हाला जेवढी रक्कम पाठवायची आहे, तो आकडा टाका.
  • आता इतर माहिती भरून 'Confirm' वर क्लिक करा.
  • व्यवहार सुरक्षितरित्या पार पडण्यासाठी तुमच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.
  • हा ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.