Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Consumer Durable Product: रिपेयर किंवा खरेदी करण्याआधी जाणून घ्या या महत्वाच्या बाबी

Consumer Durable Product

Consumer Durable Product: दिवाळीला अनेकांनी ठरवल असेल की आपण फ्रीज घेऊ, मिक्सर, वॉशिंग मशीन, दागिने या पैकी काही न काही घ्यायच प्रत्येकाने ठरवल असते. फ्रीज, वॉशिंग मशीन, दागिने यासारख्या अनेक वस्तु consumer durable product मध्ये येतात. हे प्रॉडक्ट रिपेयर किंवा खरेदी करण्याआधी त्याबाबत जाणून घ्या काही महत्वाच्या बाबी.

Consumer Durable Product: दिवाळी अगदी दोन दिवसांवर आली आहे, अनेकांनी शॉपिंग केली, कोणाची लिस्ट तयार झाली, कोणी शॉपिंग करत आहे. सामान्य माणसाचे काही विचार असतात, जे तो कुटुंबाच्या आनंदासाठी करीत असतो. नोकरी करणार असो, शेती करणार असो किंवा व्यावसायिक असो प्रत्येकच जण आपल्या कुटुंबासाठी काही न काही विचार करीत असतो. आता या दिवाळीला अनेकांनी ठरवल असेल की आपण फ्रीज घेऊ, मिक्सर, वॉशिंग मशीन, दागिने या पैकी काही न काही घ्यायच प्रत्येकाने ठरवल असते. फ्रीज, वॉशिंग मशीन, दागिने यासारख्या अनेक वस्तु कंज्यूमर ड्युरेबल प्रॉडक्टमध्ये येतात. 

कंज्यूमर ड्युरेबल प्रॉडक्ट म्हणजे काय? What is Consumer Durable Product?

कंज्यूमर ड्युरेबल प्रॉडक्ट (consumer durable product) म्हणजेच ग्राहकोपयोगी वस्तू. तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ टिकणारी उत्पादने असतात त्याला आपण ग्राहकोपयोगी वस्तू म्हणतो. त्यामध्ये मोबाइल घरे, मोठी आणि छोटी उपकरणे, फर्निचर, कार्पेट आणि रग, ऑटोमोबाईल्स, रबर टायर, लीड-ऍसिड ऑटोमोटिव्ह बॅटरी, बोटी, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, क्रीडासाहित्य, घरगुती वस्तू आणि दागिने यांचा समावेश होतो.

कंज्यूमर ड्युरेबल प्रॉडक्ट केव्हा खरेदी करावे? 

कंज्यूमर ड्युरेबल प्रॉडक्ट आपण कधीतरी एकदा खरेदी करतो, आणि मग काही वर्षानी त्यात बिघाड होतो. मग तेव्हा ही वस्तु आपण रिपेयर करायची की नवीन घ्यायची याबबात काही टिप्स जाणून घ्या या लेखातून. कंज्यूमर ड्युरेबल प्रॉडक्ट हे वेगवेगळे आहेत. इलेक्ट्रिक, घरगुती सामान, स्थायी संपत्ती त्यानुसार आपण ठरवूया की कोणते प्रॉडक्ट रिपेयर करायचे आणि कोणते नवीन घ्यायचे. प्रॉडक्ट रिपेयर किंवा खरेदी करण्याआधी लक्षात घ्यावयाच्या बाबी.. 

वस्तूची स्थिति Item status

ग्राहपयोगी वस्तूमध्ये बिघाड झाला तेव्हा सर्वात महत्वाची असते ती म्हणजे त्या वस्तूला किती वर्ष झालीत, आता ती कोणत्या स्थितीत आहे. उदा. फ्रीज घेऊन जर 10 वर्ष झाले असतील आणि त्यात बिघाड झाला, तर तुम्हाला नवीन फ्रीजचे ऑप्शन योग्य राहील. कारण फ्रीजची मोटर आणि कंप्रेसर गरम होण्याची शक्यता असते त्यामुळे इलेक्ट्रिक बिल वाढते. इलेक्ट्रिक बिल वाढले की सहजच तुम्हाला लागणारा खर्च वाढतो म्हणून नवीन फ्रीज घेणे हाच पर्याय योग्य राहील.

बजेट Budget

अनेकदा काय होत बिघडलेल्या वस्तूला रिपेयर करायलाच वस्तूच्या किमती इतका खर्च लागतो. म्हणजेच खर्च सारखाच होणार, तेव्हा सुद्धा तुम्हाला नवीन प्रॉडक्ट विकत घेणे योग्य राहील. उदा. कमी कालावधीत जर फ्रीजमध्ये बिघाड झाला तर त्याला दुरुस्तीचा लागणारा खर्च बघून तुम्ही निर्णय घेऊ शकता. 

रिपेयर वॉरंटी आणि गॅरंटी Repair Warranty and Guarantee

वस्तुमध्ये बिघाड झाल्यावर रिपेयर करताना एखादे नवीन सामान वापरले तेव्हा त्या सामानाची सुद्धा  वॉरंटी आणि गॅरंटी असणे आवश्यक आहे. तुमचा रिपेयरिंगचा खर्च वारंवार केल्या पेक्षासुद्धा नवीन प्रॉडक्ट घेणे योग्य राहील.  

मॉडेल model

तुम्ही घेतलेल्या वस्तूला खूप वर्ष उलटून गेले आता त्याच्या जेनरेशनमध्ये खूप बदल झालेत. ते व्यवस्थित चालत नाही अशा स्थितित  सुद्धा तुम्ही नवीन वस्तु घेऊ शकता. अन्यथा खर्च करण्याची गरज नाही