Diwali sale: बापरे! किती ही धावपळ. नुकताच दसरा गेला आणि लगेच दिवाळी सुद्धा आली आणि महिलांची शॉपिंग करण्याची वेळ झाली. महिलांच एक विशेष असते शॉपिंग तर करायची असते, वस्तु तर घ्यायची असते पण बारगेनिंग शिवाय काम भागत नाही. पण आता बारगेनिंग करायची संधीच मिळणार नाही. ऍमेझॉन, मिंत्रा, तनिष्क, फ्लिपकार्ट, मायग्लाम घेऊन आले आहेत तुमच्यासाठी बेस्ट डिल्स, सविस्तर माहिती साठी वाचा
Table of contents [Show]
ऍमेझॉन Amazon
ऍमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (Amazon's Great Indian Festival)सेल सुरू आहे. दिवाळीसाठी बेस्ट डिल्स, कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध आहेत. सौंदर्य, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू, गीअर्स आणि गॅझेट्स वर मोठी सूट देण्यात येत आहे. यातून तुमची नक्कीच बचत होईल. या वर्षीच्या Amazon सेलमध्ये मेकअप किट आणि कॉम्बोजवर किमान 40 टक्के सूट, घरगुती आणि स्वयंपाकघरातील वस्तूंवर 70 टक्के सूट, 999 रुपयांपासून सुरू होणारी गॅझेट, बाळाच्या आवश्यक वस्तूंवर 60 टक्के सूट, पुरुषांच्या फॅशनवर 50 ते 80 टक्के सूट देण्यात येत आहे.

मिंत्रा Myntra
मिंत्रा हे सर्व प्रकारच्या फॅशन, लाइफस्टाईल Lifestyle आणि भेटवस्तूंच्या गरजांसाठी एक चांगले शॉपिंग डेस्टिनेशन आहे. ‘फेस्टिव्हल ऑफ डील-लाइट्स’ Festival of Deal-Lights हे मिंत्रा सेलचे नाव आहे. सध्या कपडे, अॅक्सेसरीज, ब्युटि प्रॉडक्ट आणि गॅझेट्स यांच्या रेंजमध्ये ५० ते ८० टक्के सूट देत आहे. घरगुती वस्तु आणि फर्निचरवर 40 ते 70 टक्के सूट आहे. 999 रुपयांपेक्षा कमी अॅक्टिव्हवेअर, किड्स वेअर फ्लॅट 70 टक्के सूट देण्यात आली आहे.

तनिष्क Tanishq
स्त्रियांचा जीव की प्राण म्हणजेच दागिने. दागिन्यांपुढे बाकीच्या गोष्टी मागे पडतात. तुमच्यासाठी खास तनिष्क ज्वेलर्स कडून भन्नाट ऑफर देण्यात येत आहे. सोने बनवण्याच्या शुल्कावर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मूल्यावर 20 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. तुम्ही ठरवलेले बजेटही बिघडणार नाही आणि बचत सुद्धा होईल.

मायग्लाम Myglamm
मायग्लामकडे खास तयार केलेल्या लक्स गिफ्ट सेटची रेंज आहे जी सध्या 30 टक्क्यांपर्यंत सुटीवर उपलब्ध आहे. सेल्फ-केअर गिफ्ट सेट, मॅनिक्युअर गिफ्ट सेट, लिपस्टिक गिफ्ट सेट, मेकअप गिफ्ट सेट इत्यादि.

फ्लिपकार्ट Flipkart
फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल तुमच्या सर्व खरेदी गरजा पूर्ण करण्यासाठी आणखी एक चांगले प्लॅटफॉर्म आहे. बाय मोअर सेव्ह मोअर ऑफर आणि दिवसातील सर्वोत्तम डील आणि कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्य, फर्निचर आणि इतर अनेक रेंजमध्ये मोठ्या सवलतींमधून, या फ्लिपकार्ट सेलमध्ये एक्सप्लोर करण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी भरपूर ऑफर आहेत.
