• 07 Dec, 2022 08:42

What is Warranty and Guarantee: तुम्हाला दोघांमधील फरक माहित आहे का?

What is warranty and guarantee

What is Guarantee and Warranty : अनेकांना गॅरंटी आणि वॉरंटीबाबत कन्फ्युजन असते, गॅरंटी म्हणजे नेमक काय? आणि वॉरंटी म्हणजे नेमक काय? जाणून घ्या या लेखातून.

What is Guarantee and Warranty : जेव्हा तुम्ही एखादी वस्तू घेण्यासाठी दुकानात जाता तेव्हा दुकानदार तुम्हाला वस्तूची गॅरंटी आणि वॉरंटी देऊन फसवण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळा आपण गॅरंटी आणि वॉरंटीशिवाय वस्तु घेत नाही. कारण आपल्याला माहित असते की, काही दिवसांनी वस्तु खराब झाली तर आपण काही करू शकणार नाही, पण जर वस्तूला गॅरंटी किंवा वॉरंटी असेल तर आपण खराब झालेली वस्तु दुरुस्त करू शकतो किंवा बदलवून घेऊ शकतो.

अनेकांना गॅरंटी आणि वॉरंटी दोन्ही एकच वाटतात, पण यामध्ये बराच फरक आहे. काहींना या दोघातला फरक कळत नाही त्यामुळे ते गोंधळून जातात की गॅरंटी म्हणजे काय? आणि वॉरंटी म्हणजे काय?  जर तुमचाही कोणत्याही प्रकारचा संभ्रम असेल तर सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखातून. 

[media url="https://www.youtube.com/watch?v=KOMwnjzNlgk"][/media]


वॉरंटी म्हणजे काय? (What is Warranty?) 

जर एखाद्या दुकानदाराने कोणत्याही वस्तूची वॉरंटी दिली तर त्याचा अर्थ असा की दुकानदाराने दिलेल्या वेळेत वस्तु खराब झाली तर दुकानदार त्या खराब झालेल्या वस्तूंची दुरुस्ती करून देईल आणि त्याचा कोणताही खर्च तुम्हाला लागणार नाही, यालाच वॉरंटी म्हणतात. जेव्हा ग्राहकाला वॉरंटी दिली जाते तेव्हा त्याच्यासोबत वॉरंटी बिल देखील दिले जाते. वस्तु खराब झाल्यास ग्राहकाला हे वॉरंटी बिल दाखवून दुकानदाराकडून वस्तु दुरुस्त करून घेता येते. बहुतेक प्रॉडक्टची वॉरंटी लिमिट 1 वर्षापेक्षा जास्त आहे.

गॅरंटी म्हणजे काय? (What is Guarantee?)

दुकानदार एखाद्या वस्तूला गॅरंटी देतो, याचा अर्थ असा होतो की जर गॅरंटी कालावधीत वस्तु खराब झाली तर दुकानदार ती वस्तु परत घेतो आणि तुम्हाला नवीन वस्तू देतो, यालाच गॅरंटी म्हणतात. यामध्ये देखील वस्तु घेताना गॅरंटी कार्ड किंवा बिल दिले जाते, जे ग्राहकाने त्याच्याकडे सांभाळून  ठेवणे आवश्यक असते, जेणेकरून गॅरंटी कालावधीत वस्तु खराब झाल्यास, गॅरंटी कार्ड दाखवून ग्राहक आपली वस्तु बदलवून शकतो. 

Guarantee vs. Warranty
 

गॅरंटी आणि वॉरंटीचा कालावधी आणि अटी (Warranty period and conditions)

गॅरंटी आणि वॉरंटी या दोन्हीमध्ये फरक आहे हे लक्षात आल्यानंतर गॅरंटी आणि वॉरंटीच्याबाबत काही महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे, जवळजवळ प्रत्येक वस्तूवर वॉरंटी उपलब्ध असते.  परंतु गॅरंटी फक्त काही निवडक वस्तूंवर उपलब्ध असते. वॉरंटी वेळ जास्त असतो तर गॅरंटी वेळ कमी असतो. दोन्हीच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर गॅरंटीमध्ये जास्त फायदा होतो कारण वस्तु दुरुस्त होण्याऐवजी नवीन वस्तु मिळते.

Terms and Conditions for Purchase Order

वस्तूची गॅरंटी असो की वॉरंटी दोन्हीमध्ये तुम्हाला वस्तू खरेदी करण्यासाठी एक बिल दिले जाते, जे तुम्हाला सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. हे बिल जर कुठेतरी हरवले तर तुम्हाला तुमची वस्तु दुकानदाराकडून योग्य किंवा नवीन मिळू शकत नाही कारण हे बिल पाहिल्यानंतरच दुकानदार तुमच्या गॅरंटी आणि वॉरंटीबाबत दखल घेतो.