• 04 Oct, 2022 15:15

आर्थिक स्वातंत्र्यासाठी तरुण महिलांनी या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा

Women's Financial Planning

Women's Financial Freedom: आर्थिक स्वातंत्र्य हे के‌वळ मोठी रक्कम मिळवण्यासारखे नाही. तुम्हाला संपूर्ण आयु्ष्यभर आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर, योग्य नियोजन, गुंतवणूक आणि वित्तव्यवस्थापन करावे लागेल. तुम्ही तरुण असाल तर वित्तीय स्वातंत्र्य हे उत्तम शिक्षण, योग्य आर्थिक नियोजन आणि अचूक गुंतवणुकीतून मिळते, हे समजून घेणे आवश्यक आहे.

तुम्ही तरुण आणि एकट्या आहात का? मग दीर्घकाळासाठी आर्थिक स्वातंत्र्य टिकवून कसे ठेवायचे, हा विचार करायला सुरूवात केली पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य हे के‌वळ मोठी रक्कम मिळवण्यासारखे नाही. तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर, योग्य नियोजन, गुंतवणूक आणि वित्त व्यवस्थापन करावे लागेल. तुम्ही तरुण असाल तर वित्तीय स्वातंत्र्य हे उत्तम शिक्षण, योग्य आर्थिक नियोजन आणि अचूक गुंतवणुकीतून मिळते, हे समजून घेणे आवश्यक आहे.  

उच्च शिक्षण घ्या आणि करियर घडवा (Higher Education is Foundation of Bright Career) 

अर्थव्यवस्थेतील संघटित क्षेत्रात नोकरीसाठी आणि स्थिर व उच्च उत्पन्न मिळवण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे तरुण महिलांनी महाविद्यालयीन शिक्षणात गुंतवणूक केली पाहिजे. करिअर सुरु करण्यासाठी दर्जेदार संस्थेत शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वित्त व्यवस्थापन करण्यासाठी तरुण महिलांनी आर्थिक साक्षर होणं गरजेचे आहे. प्राथमिक शिक्षण आणि मूलभूत ज्ञानाशिवाय अर्थव्यवस्थापन करणे कठीण आहे. त्यामुळे तुम्ही तरुण महिला असाल, मूलभूत आर्थिक व्यवस्थापनाविषयी आपण शिक्षण घेणे आवश्यक आहे.

वित्तीय व्यवस्थापन आवश्यक (Need Financial Management) 

सर्वप्रथम, तुम्ही तुमची वित्तीय उद्दिष्टे स्पष्ट करणे आवश्यक आहे. मग ती मुलांचे शिक्षण असो वा निवृत्तीनंतरच्या जीवनाचा दर्जा असो. तुमचा आर्थिक आराखडा तयार करताना, महागाईचा घटक लक्षात घेणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्ही योग्य वित्तीय व्यवस्थापकाचा सल्ला घेत असाल तरी स्वत:च्या संशोधनाला जास्त महत्त्व आहे. अधिकृत वेबसाइटवरून वित्तीय साधनांची माहिती घेता येते. इतरांनी निवड केलेल्या आर्थिक नियोजनावरच अडकून राहू नका. तुम्हाला तुमची जोखिमीची भूक, वित्तीय उद्दिष्टे, जीवनाच्या टप्प्यांवरील गरजा हे लक्षात घेऊन स्वत:चे वैयक्तिक आर्थिक नियोजन करावे लागेल. आर्थिक उद्दिष्टांचे वास्तववादी आकलन करतानाच, घटस्फोट, मृत्यू इत्यादी आकस्मिक संकटांनुसार नियोजन करण्याची आवश्यकता आहे. एखादे संकट किंवा दुर्दैवी अपघातानंतरही आपले आर्थिक स्वातंत्र्य टिकून राहिले पाहिजे.

गुंतवणुकीला लवकरात लवकर सुरुवात करा (Start Investment At Earliest) 

तुम्ही नुकतीच करिअरला सुरुवात केली असेल तर अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तुम्ही ज्यात गुंतवणूक करत आहात, त्यासाठी जास्त कर्ज घेण्याची गरज नाही, याची खात्री करुन घ्या. स्मार्ट गुंतवणूक करताना, हे सुनिश्चित करावे लागेल की, जोखीम विविध साधनांवर विभागलेली असते. इक्विटीसारख्या उच्च जोखीम असलेल्या साधनांची भरपाई बाँड्सद्वारे केली पाहिजे. तुमच्या गुंतवणुकीच्या समूहात इक्विटी, कर्ज, जीवन विमा, रिअल इस्टेट इत्यादीचे विवेकी संयोजन असावे.

इक्विटी हा उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. निवृत्तीनंतरचे म्हणजेच दीर्घकालीन अर्थव्यवस्थापन करण्यासाठी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) द्वारे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे अधिक हुशीरीचे लक्षण आहे. तुम्ही योग्य आरोग्य विमा योजनेतही गुंतवणूक केली पाहिजे, म्हणजे तुम्ही तरु असला तरी वयानुसार, काही आरोग्याच्या समस्या उद्भ‌‌‌वू शकतात. आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याकरिता आपण लिक्विड फंड बिल्डिंगमध्येही गुंतवणूक केली पाहिजे. अल्पमुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, एफडी, पोस्ट ऑफिस डिपॉझिट, डेब्ट फंड आणि फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (एफएमपी) सारख्या साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देता येईल.