Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget Planning Tips: उत्तम बजेट प्लॅन करायचा असेल, तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Budget Planning Tips

Budget Planning Tips: कोणत्याही गोष्टीवर खर्च करण्यापूर्वी त्याचे आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे अतिशय गरजेचे आहे. हे नियोजन बजेटिंगच्या (Budgeting) मदतीने केले जाऊ शकते. उत्तम बजेट प्लॅन करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, ते जाणून घेऊयात.

कोणताही खर्च करण्त्यायापूर्वी खर्चाचे आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे अतिशय गरजेचे आहे. या आर्थिक नियोजनामुळे आपल्याला खर्चाचा अंदाज येतो आणि वायफळ खर्च टाळला जातो. यामुळे आपल्या पैशांची बचत होते. म्हणूनच तर अनेक मोठमोठ्या कंपन्या वार्षिक आधारावर कंपनीचे बजेट ठरवतात.

आपण देखील दैनंदिन आयुष्यात वैयक्तिक बजेट (Personal Budget) प्लॅन करू शकतो. हे बजेट आठवडा, पंधरवडा, मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर तयार केले जाऊ शकते. यामुळे खर्चाचे योग्य पद्धतीने नियोजन करणे सोपे जाते. तुम्हाला देखील उत्तम बजेट प्लॅन करायचा असेल, तर त्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या जाणून घेऊयात.

खर्चाचा मागोवा घ्यायला शिका (Learn to track expenses)

उत्तम बजेट प्लॅन करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टीवर खर्च करता, याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही सलग एक महिना तुम्ही केलेल्या खर्चाची नोंद ठेवा. अगदी एक रुपया जरी खर्च केला, तरी त्याची नोंद नोंदवहीत ठेवा. साधारण एक महिना ही गोष्ट तुम्ही सातत्याने करा.

एका महिन्यानंतर तुम्हाला तुम्ही कोणत्या गोष्टीवर किती खर्च करता हे लक्षात येईल. आता तुम्ही तुमचे मासिक उत्पन्न बजेटिंग अँपच्या मदतीने विभागून घ्या किंवा तुमचे महत्त्वाचे खर्च विभागून त्यावर किती टक्के रक्कम खर्च करायची हे ठरावा. या बजेट प्लॅनमध्ये बचत आणि गुंतवणुकीचे दोन वेगवेगळे प्लॅन करा.

खर्चाची गणना करा (Calculate the cost)

साधारण 1 महिन्याच्या खर्चाचा मागोवा घेतल्यावर तुम्ही कोणत्या गोष्टीवर किती खर्च करता याचे गणित समजून येईल. आता तुम्हाला या खर्चाची गणना करावी लागेल. थोडक्यात तुमचे अती महत्त्वाचे खर्च जसे की, घराचे हप्ते, वीज बिल, गॅस बिल, रिचार्ज, घरातील किराणामालाचे बिल इ. खर्चाची निश्चित रक्कम उत्पन्नातून बाजूला काढावी लागेल.

उर्वरित रकमेचे तीन भाग करावे लागतील. हे तीन भाग बचत (Saving), आर्थिक गुंतवणूक (Financial Investment) आणि उपभोगाच्या गोष्टी (Things of consumption) यांमध्ये विभागावी लागेल. अशा पद्धतीने विभाजन केल्यावर तुम्ही उत्तम पद्धतीने आर्थिक बचत, गुंतवणूक आणि खर्च करू शकता.

आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करा (Set financial goals)

बजेटिंग करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करणे. या आर्थिक उद्दिष्टांमध्ये  गुंतवणूक हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बजेट प्लॅन (Budget Plan) करताना बचतीचा विचार पहिल्यांदा करायला हवा. कोणताही खर्च करण्यापूर्वी बचत हा मुद्दा आपल्या डोक्यात फिक्स असायला हवा. आज केलेली बचत आणि गुंतवणूक उद्याची मालमत्ता निर्माण करू शकते.

आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित केली असतील, तर बचत (Saving) करणे सोपे जाते. ही उद्दिष्ट्ये ठरवताना गुंतवणूक कालावधी, त्यावर मिळणारा व्याजदर आणि मॅच्युरिटीवेळी मिळणारी रक्कम या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. त्यासोबतच कर बचतीच्या योजनांमध्ये देखील गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला कर सवलत घेता येऊ शकते.

भविष्यातील धोक्यांचा विचार करा (Consider future threats)

एकदम पैसे खर्च करण्यापूर्वी भविष्यातील धोक्यांचा विचार करायला शिका. हे धोके वेगवेगळ्या स्वरूपातील असू शकतात. जसे की, नोकरी जाणे, गंभीर आजार होणे इ. अशा परिस्थितीत पैशांची गरज जास्त असते. त्यामुळे त्याचे आर्थिक नियोजन सुरुवातीपासूनच करायला हवे.

हे नियोजन करताना इमर्जन्सी फंड (Emergency Fund), आरोग्य विमा (Health Insurance), टर्म इन्शुरन्स (Term Insurance) यासारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करायला हवी. जेणेकरून भविष्याची तरतूद केली जाईल.