Diwali Gift for Employees : वाईटावर चांगल्याचा विजय झाला म्हणून साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी निमित्य भेटवस्तूची देवाणघेवाण होते. भेटवस्तू देणे हा केवळ दिखावा नसून ती एक प्रथा आहे. प्रत्येक जन आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देतात. फक्त कुटुंबच नाही तर व्यावसायिक जगातही असेच आहे. तुमच्या कर्मचार्यांना आनंदी ठेवणे आणि त्यांची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी असते. व्यावसायिक संबंध अतूट व्हावे याकरिता कर्मच्याऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट देणे महत्वाचे ठरते.
पण त्यांना नेमक काय द्याव हा प्रश्न नेहमी उद्भवतो, त्याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Table of contents [Show]
कर्मचार्यांसाठी 5 कॉर्पोरेट दिवाळी गिफ्ट
ड्रायफ्रूट्स बॉक्स (The Goodness of Assorted Dry Fruits)
आणखी एक क्लासिक आणि सर्वात आवडती दिवाळी भेट म्हणजे ड्रायफ्रूट्स बॉक्स. ते फक्त दिसायलाच आकर्षक नाही तर आरोग्यासाठीही चांगले असते. ते सहजपणे उपलब्ध होऊ शकते आणि त्यात तुटफुट होण्याची भीती राहत नाही. त्यामुळे ते कॉर्पोरेट भेटवस्तू म्हणून अतिशय योग्य आहे.
दिवाळीत एक्स्ट्रा सुटी (Extra Paid Time off)
दिवाळी हा कुटुंब (Family) आणि मित्रांसोबत साजरा करायचा सण आहे. तुमच्या कर्मचार्यांना एक्स्ट्रा सुट्या देऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी देऊ शकता. यापेक्षा सुंदर आणि भावनिक भेटवस्तू त्यांच्यासाठी कोणतीही नाही.
कॅश इन हॅण्ड किंवा बोनस (Cash in Hand or Bonus)
दिवाळीला लक्ष्मी पूजनाचा सर्वाधिक मान असतो. लक्ष्मी म्हणजेच पैसा, समृद्धी आणि संपत्तीशी निगडीत. तुमच्या कर्मचार्यांना बोनसचे चेक पाठवणे हा सण साजरा करण्याचा अजून एक उत्तम पर्याय आहे.
क्लासिक फेंग शुई (Classic Feng Shui)
अनेकांचा असा विश्वास आहे की चीनी वस्तूमधील काही वस्तु गुडलक म्हणून देतात. त्यामुळे आनंद आणि लक दोन्ही द्विगुणित होतात. कासव, तीन पायांचे बेडूक, लकी बांबू, लाफिंग बुद्ध आणि चाइम्स हे काही सर्वाधिक फेमस फेंग शुई घटक आहेत.
सरप्राईज ग्रॅब बॅग (Surprise Grab Bag)
थोडासा विचार खूप पुढे जातो. जर तुम्हाला तुमच्या कर्मचार्यांना थोडे अधिक नावीन्यपूर्ण आणि विशेष भेट दयावी असे वाटत असेल तर तुमच्यासाठी ही एक अमेझिंग आयडिया आहे. यात चित्रपटाची तिकिटे, गिफ्ट व्हाउचर, ऑफिसमधील कामाच्या वस्तु, फोन कव्हर किंवा पाण्याच्या बाटल्या असू शकतात. तुमचे कर्मचारी रॅनडमली सरप्राईज ग्रॅब बॅग निवडू शकतात. यामधीलच एक दिवाळी गिफ्ट देऊन आपल्या कर्मच्याऱ्याना तुम्ही आनंदी ठेवू शकता.