फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय अशी गुंतवणूक योजना आहे. या गुंतवणूक योजनेत जोखीम कमी असते आणि तुम्हांला हवे तेव्हा तुम्ही तुमचे पैसे काढू शकता ही सोय असल्यामुळे अनेकजण या अयोज्नेत पैसे गुंतवत असतात.
इतर गुंतवणूक योजनेत जोखीम जास्त असते. एसआयपी, शेयर मार्केट आदी योजनांमध्ये नागरिक आता कुठे गुंतवणूक करू लागले आहेत. मात्र वयस्कर मंडळी अजूनही Fixed Deposit लाच पसंती देतात. तसेच कमी कालावधीसाठी कुठली गुंतवणूक करायची असल्यास या योजनेत पगारदार नोकर देखील गुंतवणूक करत असतात. तुम्ही देखील अशाच योजनेत गुंतवणूक करायची योजना आखत असाल तर ही बातमी जाणून घ्या.
वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे व्याजदर असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या बँकेत Fixed Deposit गुंतवणूक करणार आहात त्यावर तुम्हाला किती रिटर्न मिळतील हे ठरत असते. त्यामुळे बँक निवडताना जर खबरदारी घेतली तर तुम्हांला चांगला परतावा मिळू शकतो हे लक्षात असू द्या. काही चांगला व्याजदर देणाऱ्या बँकांची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
Table of contents [Show]
IDFC फर्स्ट बँक (IDFC First Bank)
IDFC फर्स्ट बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1 वर्ष ते 550 दिवसांपर्यंतच्या FD वर 7.50% व्याज देत आहे तर बँकेच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8% व्याज देत आहे.
येस बँक (Yes Bank)
येस बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 18 महिने ते 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.75% व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.25% व्याज देत आहे.
इंडसइंड बँक (IndusInd Bank)
IndusInd बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 2 वर्षे 9 महिने ते 3 वर्षे 3 महिन्यांपर्यंतच्या FD वर 7.50% व्याजदर देत असून आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8% व्याजदर देत आहे.
SVM बँक (SVM Bank)
SVM बँकेकडून मुदत ठेवीवर म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटवर 8 टक्क्यांहून अधिक व्याज दिले जात आहे. बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 8.25% व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.75% व्याजदर दिले जात आहे.
बंधन बँक (Bandhan Bank)
बंधन बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 600 दिवसांच्या मुदत ठेवींवर 8% व्याजदर देत आहे. तर, ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.50% व्याजदर दिले जात आहे.
DCB बँक (DCB Bank)
बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार DCB बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 36 महिन्यांच्या FD वर 8% तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.50% व्याज देत आहे.
करूर वैश्य बँक (Karur Vysya Bank)
करूर वैश्य बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 444 दिवसांच्या FD वर 7.50% व्याजदर देत आहे, तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8% व्याजदर देऊ करत आहे.
एचएसबीसी बँक (HSBC Bank)
HSBC बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 732 दिवस ते 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.50% व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8% व्याजदर देत आहे.
डॉइश बँक (Deutsche Bank AG)
डॉइश बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.75% व्याज देत आहे, तर ती ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.75% व्याज देत आहे.
RBL बँक (RBL Bank)
RBL बँक आपल्या सामान्य ग्राहकांसाठी 24 महिने ते 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8% व्याज देत आहे.