सध्या देशभरात आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची चर्चा सुरु आहे. 30 जून 2023 पर्यंत ग्राहकांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ज्या खातेदारांना त्यांचे कार्ड लिंक करता आले नाही त्यांना येत्या काळात आर्थिक व्यवहार करताना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
जर तुम्ही मुदत ठेवीत गुंतवणूक केली असेल आणि तुम्ही तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुम्हांला मिळणाऱ्या व्याजदरात कपात सहन करावी लागणार आहे हे लक्षात असू द्या. तसेच तुमचे पॅन कार्ड देखील निष्क्रिय असेल तरीही तुम्हांला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. सरकारचे निर्देश फॉलो न केल्यामुळे येणाऱ्या काळात देखील तुम्हांला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
भरावा लागेल 20% TDS
जर तुम्ही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केली असेल आणि तुम्ही त्यावर चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा करत असाल तर आधी हे जाणून घ्या की तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही. जर तुमचे हे दोन्ही कार्ड एकमेकांशी लिंक नसतील तर तुम्हांला मिळालेल्या व्याजावर 20% TDS भरावा लागणार आहे. सामान्य परिस्थितीत व्याजावर ग्राहकांना 10% TDS भरावा लागतो. तुमचे कार्ड लिंक नसल्यास किंवा पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास तुम्हांला तुमच्या मुदत ठेवीसाठी फॉर्म 15G/H सबमिट करण्याची परवानगी दिली जाणार नाहीये. तसेच दुप्पट TDS भरावा लागणार आहे.
पॅन कार्ड होणार निष्क्रिय!
ज्या खातेदारांनी आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही त्यांचे पॅन कार्ड 16 सप्टेंबरपासून निष्क्रिय होणार आहे. तसेच त्यांनतर जर ग्राहक आर्थिक व्यवहार करणार असतील तर त्यांना फॉर्म 15G/H सबमिट करण्याची परवानगी दिली जाणार नाहीये आणि निष्क्रिय पॅनसाठी अधिक TDS कपात लागू होणार आहे.
निष्क्रिय पॅन पुन्हा कसे सक्रिय कराल?
जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुम्ही आता देखील ते लिंक करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हांला आता पैसे मोजावे लागणार आहेत. यासाठी तुम्हांला 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी दंड भरण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
1. इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा. 
2. डॅशबोर्डवर आधार लिंक या बटनावर क्लिक करा. 
3. तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाका. 
4. E-Pay Tax च्या माध्यमातून Continue to Pay वर क्लिक करा. 
5. OTP प्राप्त करण्यासाठी तुमचा पॅन नंबर आणि मोबाईल नंबर सबमिट करा. 
6. ओटीपी टाकल्यानंतर ‘ई-पे’ टॅक्स बटणावर क्लिक करा. 
7. AY 2024-25 निवडा आणि पेमेंटचा प्रकार निवडा
8. फी भरल्यानंतर तुम्ही पॅनला आधारशी लिंक केले जाईल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                            