PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्यानंतर शेतकरी 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये दर 4 महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठवले जातात. कोणत्याही परिस्थितीत हा हप्ता कोणत्याही अपात्र व्यक्तीच्या खात्यात जाऊ नये, असा निर्णयही केंद्र सरकार घेत आहे. आता केंद्र सरकार 14वा हप्ता पाठवण्याच्या तयारीत आहे. मे किंवा जूनमध्ये 14वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण जर एखादी व्यक्ती फसव्या मार्गाने हप्ते घेण्याचा विचार करत असेल तर त्याने सावध राहण्याची गरज आहे.
लाखो अपात्र शेतकरी यादीतून बाहेर
8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 वा हप्ता पाठवण्यात आला आहे. प्रत्येक परिस्थितीत कोणताही अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी केली जात आहे. शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि बँक कागदपत्रेही अपडेट करण्यात येत आहेत. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही. त्यांनाही योजनेचा लाभ दिला जात नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 12व्या आणि 13व्या हप्त्यात केंद्र सरकारने लाखो अपात्र शेतकर्यांना यादीतून बाहेर केले आहे.
चुकीची कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने कारवाई सुरू केली आहे. अशा शेतकऱ्यांकडून सरकार वसुलीही करत आहे. भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याने फसवणूक केल्यास त्याला सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार नाही असेही सांगण्यात आले आहे. चुकीचे कागदपत्रे किंवा चुकीची माहिती आढळून आल्यास आता पर्यन्त मिळालेले सरकारी योजनेचे सर्व पैसे परत घेण्यात येईल. यामध्ये मोठी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास आणखी मोठी कारवाई होऊ शकते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये फसवणुकीचे प्रकार
- मृत व्यक्तीच्या नावाने सुद्धा पैसे घेणे.
- एकाच घरातील एका पेक्षा जास्त लोकं योजनेचा लाभ घेतात.
- मृत व्यक्तीचे कागदपत्र बँकेत जमा न करणे.
- सरकारी नोकरी असतांना सुद्धा या योजनेचा लाभ घेणे.
यापैकी कोणत्याही प्रकारची फसवणूक केल्यास सरकारकडून कारवाई करण्यात येईल.
(Source: www.abplive.com)