Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IDFC Education Loan: IDFC बँकेकडून 75 लाखांपर्यंत विनातारण शैक्षणिक कर्ज; 9% पासून व्याजदर लागू

Education Loan

IDFC First बँकेकडून 75 लाखांपर्यंत विना तारण शैक्षणिक कर्ज मिळू शकते. कर्जावरील व्याजदर 9% पासून पुढे आहेत. तुम्हाला जर परदेशातही शिक्षणासाठी जायचे असेल तर ही रक्कम पुरेशी ठरू शकते. तारण ठेवावे लागत नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनाही काळजी करण्याची गरज नाही. जगभरातील 23 हजार कोर्सेससाठी एज्युकेशन लोन मिळू शकते.

IDFC Education Loan: शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. प्रतिष्ठित महाविद्यालयात डिमांडमध्ये असणाऱ्या कोर्ससला प्रवेश घेण्यासाठी लाखो रुपयांची गरज पडते. अनेक विद्यार्थ्यांचं दर्जेदार शिक्षणाचे स्वप्न पैशांमुळे अपूर्ण राहते. आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून (IDFC First Bank Education Loan) विद्यार्थ्यांसाठी खास शैक्षणिक लोन ऑफर आणण्यात आल्या आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना विनातारण कर्ज मिळू शकते.

विनातारण किती कर्ज मिळू शकते?

IDFC बँकेच्या विविध शैक्षणिक कर्ज योजनांद्वारे 75 लाखांपर्यंत विना तारण कर्ज मिळू शकते. तसेच व्याजदर 9% पासून पुढे आहेत. त्यामुळे जर तुम्हाला परदेशातही शिक्षणासाठी जायचे असेल तरी ही रक्कम पुरेशी ठरू शकते. तारण ठेवावे लागत नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनाही काळजी करण्याची गरज नाही.

बँकेद्वारे जगभरातील 3,200 विद्यापीठांच्या 23 हजार कोर्सेससाठी शैक्षणिक कर्ज दिले जाते. तसेच तत्काळ कर्जाची रक्कम खात्यात ट्रान्सफर केली जाईल, असा दावा बँकेने केला आहे. बँकेच्या संकेतस्थळावर तुम्ही कर्जाची रक्कम, व्याजदर, कालावधी, इएमआय कॅलक्युलेट करू शकता.

एज्युकेशन लोनसाठी खास अ‍ॅप 

IDFC First बँकेद्वारे एज्युकेशन लोनसाठी खास अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. IDFC First UNI असे या अ‍ॅपचे नाव आहे. अँड्रॉइड मोबाइलवरुन हे अ‍ॅप तुम्हाला सहज डाऊनलोड करता येईल. या अ‍ॅपद्वारे देशातील आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी कर्ज मिळेल. पहिल्यांदाच अ‍ॅपवर येणाऱ्यांना मोफत काऊन्सलिंगची सुविधाही देण्यात येते. 

एज्युकेशन लोन घेताना शुल्क किती लागू शकते?

IDFC बँकेद्वारे शैक्षणिक कर्ज घेताना 1.5 टक्क्यांपर्यंत प्रोसेसिंग फी आकारली जाते. स्टँप शुल्क सरकारी नियमानुसार लागू होईल. जर कर्ज रद्द करत असाल तर कर्जाच्या रकमेच्या 1 टक्के आणि कर्ज मिळाल्यापासून रद्द करेपर्यंतच्या कालवधीचे व्याज शुल्काच्या स्वरुपात घेतले जाईल. 30 दिवसांच्या आत किंवा पहिला ईएमआय देण्यापूर्वी रद्द करण्याची विनंती मंजूर केली जाईल. त्यानंतर कर्ज फोरक्लोजर समजले जाईल. इतर प्रकारचे शुल्क तुम्ही या लिंकवर पाहू शकता. 

कोणते खर्च भागवण्यासाठी कर्ज मिळू शकते?

ट्युशन फी आणि इतर शैक्षणिक शुल्क. होस्टेल फी, परीक्षा, लायब्ररी, लॅबोरेटरी शुल्क, पुस्तके, उपकरणे, युनिफॉर्म शुल्क, ट्रॅव्हल खर्च, लॅपटॉप, कॉम्प्युटरचा खर्च, विमा, परदेशात जात असाल तर ओव्हरसिस इन्शुरन्सचा खर्चही मिळेल. वरील सर्व गोष्टी शैक्षणिक कर्ज देताना विचारात घेतल्या जातील.