Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IdeaForge Technology IPO: आयडिया फोर्जचे आज लिस्टिंग; गुंतवणूकदारांना 77 टक्के फायदा होण्याची चिन्हे!

IdeaForge Technology IPO List todya

IdeaForge Technology IPO: आयडिया फोर्जचा कंपनचा इश्यू गुरूवारी (दि. 6 जुलै) ग्रे मार्केटमध्ये 518 रुपयांच्या प्रीमिअमवर ट्रेड करत होता. म्हणजेच या इश्यूचा आजचा लिस्टिंगचा भाव प्रति शेअर 1190 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना या आयपीओमधून जवळपास 77 टक्के फायदा होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

IdeaForge Technology IPO: आयडिया फोर्जचा कंपनचा इश्यू गुरूवारी (दि. 6 जुलै) ग्रे मार्केटमध्ये 518 रुपयांच्या प्रीमिअमवर ट्रेड करत होता. म्हणजेच या इश्यूचा आजचा लिस्टिंगचा भाव प्रति शेअर 1190 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना या आयपीओमधून जवळपास 77 टक्के फायदा होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

ड्रोन उत्पादन करणाऱ्या आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग शुक्रवारी (दि. 7 जुलै) होत आहे. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2022 नंतर 100 टक्के सब्स्क्राईब झालेला हा पहिला शेअर आहे. आता गुंतवणूकदारांना याचे चांगले लिस्टिंग होईल अशी आशा आहे. मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते संरक्षण उद्योगातील वाढती मागणी आणि गुंतवणूकदारांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे याचे लिस्टिंग फायद्यात होऊ शकते.

आयडियाफोर्जची सार्वजनिक समभाग विक्री 26 जून 2023 पासून खुली झाली होती. ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जच्या शेअरला प्रचंड मागणी असून आयपीओतील इश्यू प्राईसच्या तुलनेत हा शेअर 75% प्रीमियमवर ट्रेड होत आहे. त्यामुळे आयपीओतील समभाग विक्रीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

काही तज्ज्ञांच्या मतानुसार, याची किमान लिस्टिंग किंमत 50-65 टक्के होऊ शकते. 672 रुपये प्रति शेअर किंमतीनुसार गुंतवणूकदारांना यातून 75 टक्क्यांपर्यंत फायदा होऊ शकतो. गुरूवारी हा शेअर ग्रे मार्केटमध्ये 518 रुपयांवर ट्रेड करत होता. म्हणजेच लिस्टिंगच्या दरम्यान याचा भाव 1190 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

आयडियाफोर्ज कंपनीने समभाग विक्रीतून 567 कोटी उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर 638 ते 672 रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला होता. याला गुंतवणूकदारांनी 4 दिवसांत मोठा प्रतिसाद दिला. यामुळे या हा इश्यू 106.6 टक्के सब्स्क्राईब झाला. 

(डिसक्लेमर : शेअर मार्केट किंव आयपीओ गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर मार्केट किंवा आयपीओ खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)