Mutual Fund NFO : आयसीआयसीआयच्या प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या एनएफओचे सबस्क्रिप्शन 10 एप्रिल पासुन उघडले आहे. गुंतवणूकदार 24 एप्रिल 2023 पर्यंत प्रुडेन्शियल इनोव्हेशन फंडमध्ये गुंतवणूक करु शकतात. या फंडात 5000 रुपयांपासुन गुंतवणूक सुरु होत आहे.
24 एप्रिल पर्यंत करु शकतात गुंतवणूक
आज मार्केटमध्ये अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड अस्तित्वात आहे. त्यात आणखी एका नवीन म्युच्युअल फंडाची भर पडली. प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या (Mutual Fund NFO) नवीन इक्विटी फंडाची मेंम्बरशीप सुरु झालेली आहे. म्युच्युअल फंड कंपनी ICICI ने हा नवा फंड मार्केट मध्ये आणला आहे. गुंतवणूकदार 24 एप्रिल 2023 पर्यंत प्रुडेन्शियल इनोव्हेशन फंडमध्ये (ICICI Pru MF) गुंतवणूक करु शकतात. हा एक ओपन एंडेड म्युच्युअल फंड आहे. यामधुन गुंतवणूकदार कधीपण पैसे काढू शकतात.
कमीतकमी 5000 रुपयांपासुन गुंतवणूक सुरु
आयसीआयसीआयच्या प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड या योजनेत कमीतकमी 5000 रुपयांपासुन गुंतवणूक सुरु केली जाऊ शकते. त्याचा बेंचमार्क NIFTY 500 TRI आहे. ही एक अशी इक्विटी योजना आहे, ज्यामध्ये दिर्घ कालावधी साठी गुंतकवणूक केल्यास गुंतवणूकदाराला त्याचा उत्तम फायदा होतो. तसेच, या योजनेचा पैसा इनोव्हेशन स्ट्रॅटेजी किंवा थीम असलेल्या स्टॉकमध्ये फंड गुंतवला जाणार आहे.
कश्या पध्दतीने भरता येईल SIP
आयसीआयसीआयच्या प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड या योजनेत 360 दिवसांच्या आत पूर्तता करण्यासाठी 1% एक्झिट लोड भरावा लागेल. सबस्क्रिप्शननंतर, SIP द्वारे या योजनेत गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. एसआयपी दररोज, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक किमान रु 100 आणि त्यानंतर रु 1 च्या पटीत करता येते. त्रैमासिक SIP (Systematic Investment Plan)किमान 5000 रुपये भरावे लागेल. सबस्क्रिप्शननंतर, SIP द्वारे या योजनेत गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. ही एसआयपी दररोज, साप्ताहिक,पाक्षिक आणि मासिक किमान 100 भरुन सुरु करता येते. तर त्रैमासिक SIP किमान 5000 रुपये भरुन सुरु करता येईल, आणि असे करणे जास्त योग्य राहील. जे गुंतवणूकदार दिर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही योजना एक चांगला पर्याय आहे.