राज्यात विविध क्षेत्रात परदेशी कंपन्याची गुंतवणूक येत आहे. त्यातच आता वाहन निर्मिती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनी ह्युंदाई मोटार्स (Hyundai Motor) या कंपनी महाराष्ट्रात तब्बल 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रातील वाहन निर्मिती क्षेत्राला चालना मिळणार असून रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.
तळेगाव MIDC मध्ये वाहन निर्मिती-
ह्युंदाई मोटार्स (Hyundai Motor) ही कंपनी राज्यात 2028 पर्यंत दोन टप्प्यामध्ये वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आहे. कंपनीकडून एकूण 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. ह्युदांई कंपनीकडून पुणे जिल्ह्यातील तळेगाव स्थित जनरल मोटर्स या कंपनीचे अधिग्रहन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही तांत्रिक बाबींमुळे ही प्रक्रिया मंदावली असली तरी आता राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी ह्युंदाई पुण्यात येण्याची निश्चित झाल्याचे स्पष्ट केले आहे.
4500 रोजगाराच्या संधी
ह्युंदाई कंपनीच्या या गुंतवणुकीमुळे राज्यात जवळपास 4500 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. याचसोबत या कंपनीची उत्पादन निर्मिती सुरू झाल्यास लहान मोठ्या पुरवठादांराना मोठ्या प्रमाणात काम मिळणार असून त्यामाध्यमातून महाराष्ट्रात 4000 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक होणार असल्याचा विश्वास उद्योग मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसेच ह्युंदाई कंपनीकडून 2028 नंतर आणखी गुंतवणूक वाढवली जाणार आहे.