Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income from Instagram: इन्स्टाग्राममधून कसा वाढेल तुमचा बिझनेस? सेलिब्रिटी कसे कमवतात पैसे? जाणून घ्या...

Income from Instagram: इन्स्टाग्राममधून कसा वाढेल तुमचा बिझनेस? सेलिब्रिटी कसे कमवतात पैसे? जाणून घ्या...

Income from Instagram: इन्स्टाग्राम रील्समधून तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. अनेकजण रील्स बनवतात, मात्र उद्देश केवळ मनोरंजनाचा असतो. अशावेळी एक दृष्टीकोन ठेवून रील्स बनवले तर त्यातून आर्थिक लाभ मिळणं कठीण नाही.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मार्क झुकरबर्ग किती पैसे कमावतात, याला तुमच्या दृष्टीनं फारसं महत्त्व असण्याचं कारण नाही. त्यासोबतच विविध क्षेत्रातले सेलिब्रिटी इन्स्टाग्रामवर आहेत. पण ते ठराविक पोस्ट करतात. तुम्हाला माहीत आहे का की या सेलिब्रिटींना प्रचंड पैसा इन्स्टाग्रामकडून मिळत असतो. एका वृत्तानुसार, क्रिकेटर विराट कोहलीला एका इन्स्टा पोस्टसाठी तब्बल 9 कोटी रुपये मिळतात. आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. विराट कोहलीच नाही, विविध खेळाडू, मनोरंजन विश्वातले कलाकार तसंच मोठी व्यक्तीमत्वे यांची इन्स्टावरची कमाई अशाच स्वरुपाची आहे.

ई-कॉमर्सचा विस्तार

इन्स्टाग्राम आणि त्यातल्या टूल्सद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय कसा वाढवू शकता, हे महत्त्वाचं आहे. आम्ही यासंदर्भातली माहिती तुम्हाला देणार आहोत. ई-कॉमर्स बिझनेस आता देशात मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. ऑनलाइन बिझनेस करणं लोकांना आता पूर्वीपेक्षा खूप जास्त सोपं झालं आहे. पण अनेकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करता येत नाही, तो मोठा करता येत नाही. अशा कामात आता इन्स्टाग्राम पोस्ट्सपासून ते इन्स्टाग्राम रील्स तुम्हाला मदत करू शकतात. अनेक छोटे मोठे व्यावसायिक, क्रिएटर्स यांनी आपला बिझनेस वाढवला आहे. तुम्हीही या टीप्स फॉलो करून व्यवसाय विस्तार करू शकता.

  • आजच्या काळात तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी इन्स्टाग्राम किती महत्त्वाचं आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठीच तुमचा व्यवसाय इन्स्टाग्रामवर शोकेस होणं आवश्यक आहे.
  • इन्स्टाग्रामच्या मंथली अ‍ॅक्टिव्ह यूझर्सची संख्या जगभरात 2 अब्ज आहे. भारतात हा आकडा 32 कोटींच्या आसपास आहे. म्हणजे तुम्ही ठरवलं तर इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकता.
  • इन्स्टाग्रामवर व्यवसाय करण्याचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी इथं असलेली जागा. तुमचा व्यवसाय लहान असो वा मोठा, प्रत्येकासाठी इन्स्टाग्रामवर व्यवसाय करणं सोपं आहे.
  • इन्स्टाग्राम तुम्हाला तुमची ब्रँड ओळख तयार करण्यात, टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यात आणि विक्री वाढविण्यात मदत करते. इन्स्टाग्रामवर थेट विक्रीसाठी विविध टूल्स उपलब्ध आहेत.
  • इन्स्टाग्रामवर इन्फ्लूएन्सर्ससोबत भागीदारी करून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस म्हणजेच जागरुकता वाढवण्यासाठी तुम्हाला मदत मिळते.

इन्स्टाग्रामवरून आपला बिझनेस कसा वाढवायचा?

  • इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून तुम्ही तुमच्या ब्रँडबद्दल माहिती देऊ शकता.
  • इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्सचा सेल वाढवू शकता. कारण स्टोरी 24 तास लाइव्ह राहते.
  • तुम्ही इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग ऑडिओसह रील तयार करू शकता. कारण आजकाल हेच सर्वात जास्त पॉप्युलर टूल आहे.
  • इन्स्टाग्रामवरच्या शॉप टॅबवर जाऊन तुम्ही तुमच्या बिझनेस प्रॉडक्ट्सची लिस्ट करू शकता. यामुळे डायरेक्ट सेल शक्य होतं. 
  • तुम्ही इतर कोणत्याही ई-कॉमर्स साइटवरून तुमचा व्यवसाय करत असाल, तर इन्स्टाग्रामद्वारे तुम्ही नव्या ग्राहकांना त्या लिंकवर नेऊ शकता.
  • इन्स्टाग्रामवर खरेदी करण्याची सुविधा देणारी पोस्टही करता येईल. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हीही याचा फायदा घेऊ शकता.
  • तुम्ही इन्स्टाग्रामवर लाइव्ह इव्हेंट किंवा सेल चालवून नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता.