अलीकडेच व्हाट्सअॅपनं (Whatsapp) काही बीटा यूझर्ससाठी चॅनेल सुरू केलं. यानंतर आता इन्स्टाग्रामचंही (Instagram) हे नवं फीचर अखेर भारतात लाँच करण्यात आलं आहे. मेटाच्या (Meta) न्यूजरूममधल्या ब्लॉग पोस्टनुसार, लाखो क्रिएटर्स त्यांच्या फॉलोअर्सशी कनेक्ट होण्यासाठी हे फीचर वापरू शकतात. आता इन्स्टाग्रामवरही हे फीचर उपलब्ध आहे. यामुळे क्रिएटर्स आणि फॉलोअर्स यांच्यात अधिक चांगले संबंध राहणार आहेत.
Table of contents [Show]
भारतात ब्रॉडकास्ट चॅनेलची सुरुवात
फेब्रुवारीमध्ये या फीचरची टेस्टिंग सुरू झाली. हे फिचर खास क्रिएटर्सना समोर ठेवून बनवण्यात आले आहे. या फीचरचा वापर करून क्रिएटर त्याच्या फॉलोअर्ससोबत मेसेज शेअर करू शकतो. मात्र फॉलोअर्स त्यांना प्रत्युत्तर देऊ शकणार नाहीत म्हणजेच रिप्लायचा ऑप्शन नसणार आहे. एवढंच नाही तर क्रिएटर्सना हवं असेल तर ते पोल पोस्ट आणि व्हॉइस नोट्स शेअर करू शकतात. याशिवाय टेक्स्ट, व्हिडिओ आणि इमेजदेखील शेअर करू शकतात. एकदा सहभागी झाल्यानंतर फॉलोअर्स चॅनलमधून बाहेरदेखील पडू शकतात.
कसं वापरावं ब्रॉडकास्ट चॅनेल?
क्रिएटर्सना ब्रॉडकास्ट चॅनेलचा अॅक्सेस मिळेल तेव्हा ते इन्स्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेजच्या (DM) माध्यमातून त्यांचा पहिला मेसेज पाठवतील. त्यानंतर लगेचच फॉलोअर्सना चॅनलमध्ये सामील होण्याची म्हणजेच कनेक्ट होण्याचं नोटिफिकेशन मिळेल. क्रिएटरला फॉलो करणारा कोणीही ब्रॉडकास्ट चॅनेल सर्च करू शकेल तसंच संबंधित कंटेंट पाहू शकेल.
फॉलोअर्सना नोटिफिकेशन
जेव्हा क्रिएटर कोणतंही अपडेट पाठवतो, तेव्हा त्याविषयी त्या फॉलोअर्सना नोटिफिकेशन जाणार आहे, जे चॅनेलमध्ये सहभागी होऊ इच्छितात. याशिवाय इन्स्टाग्राम फॉलोअर्स त्यांच्या इच्छेनुसार ब्रॉडकास्ट चॅनल म्यूट करू शकतात किंवा सोडू शकतात म्हणजेच लेफ्ट होऊ शकतात.
कसं सुरू करावं चॅनेल?
इन्स्टाग्राम ही सोशल साइट सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजेच ब्राउझरवर इन्स्टा ओपन होतं. मात्र इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनेल फक्त इन्स्टाग्राम अॅपमध्येच उपलब्ध असणार आहे. हे चॅनल तयार करण्यासाठी...
- इन्स्टाग्राम अॅपमधल्या तुमच्या डायरेक्ट मेसेज इनबॉक्समध्ये जावं आणि नवीन मेसेज लिहिण्यासाठी आयकॉनवर टॅप करावं.
- याठिकाणी तुम्हाला ब्रॉडकास्ट चॅनेल तयार करण्याचा ऑप्शन दिसेल.
- ब्रॉडकास्ट चॅनेल फक्त फॉलोअर्स किंवा सशुल्क (Paid) मेंबर्ससाठी सेट केलं जाऊ शकतं. प्रमोशनल पर्पजसाठी ते वापरलं जाऊ शकतं. म्हणजेच या सर्व पेड अॅक्टिव्हिटीज आहेत.