Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPF Withdrawal Process : 'ईपीएफ'चे पैसे ऑनलाईन कसे काढावेत?

EPF Withdrawal, Online PF Withdrawal, EPFO

EPF Withdrawal Online : भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफसाठी पात्र कर्मचाऱ्याला वैद्यकीय खर्च, लग्न, गृहकर्जाची परतफेड, अशा काही विशिष्ट परिस्थितीत तुमच्या जमा रकमेतील काही भाग काढता येतो. यासाठी तुमचा आधार क्रमांक वैध असणे आवश्यक आहे. 'ईपीएफओ'वर ऑनलाइन प्रक्रिया ही सोपी आणि जलद आहे.

काही विशिष्ट परिस्थितीत ‘ईपीएफ’मधील (EPF) पैसे अंशत: किंवा पूर्णपणे काढता येतात. जेव्हा एखादी व्यक्ती सेवानिवृत्त होते किंवा नोकरीचा राजीनामा देऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला असेल, अशा स्थितीत कर्मचाऱ्याला ईपीएफ खात्यातून पूर्ण पैसे काढता येतात. या व्यतिरिक्त वैद्यकीय खर्च, लग्न, गृहकर्जाची परतफेड, अशा काही विशिष्ट परिस्थितीत तुमच्या जमा रकमेतील काही भाग काढता येतो. यासाठी तुमचा आधार क्रमांक वैध असणे आवश्यक आहे. 'ईपीएफओ'वर ऑनलाइन प्रक्रिया ही सोपी आणि जलद आहे. मात्र यासाठी तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि संबंधित कागदपत्रांची आवश्यकता भासेल.

ऑनलाइन पद्धतीने कसे पैसे काढावेत त्याच्या स्टेप्स 

  • UAN सदस्य पोर्टलमध्ये, तुमचा UAN आणि पासवर्ड टाका.
  • टॉप मेनू बारमधून 'ऑनलाइन सेवा' निवडा, त्यानंतर ड्रॉप-डाउन मेनूमधून क्लेम (फॉर्म-31, 19,10C आणि 10D') निवडा.
  • आता, तुमच्या बँक खात्यातील शेवटचे चार अंक टाइप  करा आणि नंतर हमी प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी सत्यापित 'होय'  निवडा आणि पुढे जा.
  • 'ऑनलाइन दाव्यासह पुढे जा' (Proceed with Online Claim) पर्याय निवडा. तुमचे पैसे ऑनलाइन काढण्यासाठी 'पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म 31)' निवडा.
  • फॉर्मचा एक नवीन विभाग दिसेल, ज्यामध्ये तुम्ही आगाऊ पैसे का हवेत(purpose), आवश्यक रक्कम आणि कर्मचार्‍यांची माहिती हे पर्याय निवडणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्रासाठी बॉक्स चेक करा आणि नंतर तुमचा अर्ज सबमिट करा. तुम्ही ज्या उद्देशासाठी फॉर्म भरला आहे त्यानुसार तुम्हाला स्कॅन केलेले दस्तऐवज (डॉक्युमेंट) सबमिट करावे लागतील.
  • तुमच्या EPF खात्यातून पैसे काढले जाण्यापूर्वी आणि पैसे काढण्याच्या फॉर्मवर नमूद केलेल्या बँक खात्यात जमा करण्यापूर्वी, तुमच्या एम्प्लॉयरने पैसे काढण्याची विनंती मंजूर करणे आवश्यक आहे.
  • तुमच्या EPF-नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस सूचना मिळेल आणि ही प्रक्रिया केल्यानंतर, तुमच्या खात्यात निधी जमा केला जाईल.
  • सामान्यपणे 15-20 दिवसांत जमा केला जातो. अर्थात  EPFO ने ऑफिशिअली अशी  कालमर्यादा निश्चित केलेली नाये.

असा चेक करा EPF withdrawal स्टेटस

  • EPFO वेबसाइटवर जा
  • Our services मधील ड्रॉप डाऊन लिस्टमधून फॉर एम्प्लॉईज हा पर्याय निवडा. नो युवर क्लेम स्टेटस हा पर्याय निवडा.
  • तुमचा UAN इथे टाका. कॅप्चा कोड टाइप करा. पीएफ कार्यालयाचे राज्य, पीएफ कार्यालयाचे नाव, आस्थापना कोड आणि भविष्य निर्वाह निधी क्रमांक ही  माहिती द्या.
  • ही प्रक्रिया झाल्यावर स्टेटस चेक करण्यासाठी सबमिट करा.