Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sell Old Phone: जुना मोबाइल विकायचाय? Cashify अ‍ॅपवरून घरबसल्या सेल करा अन् मिळवा बेस्ट प्राइज

sell old phone on cashify

Image Source : www.orangetwistllc.top

जुना मोबाइल कपाटात धूळ खात पडला असेल किंवा लेटेस्ट मॉडेल घेण्यासाठी जुना फोन विकायचा असेल तर काळजी करू नका. कॅशिफायवरून तुम्ही घरबसल्या जुना फोन विकू शकता. तुमच्या फोनचे किती पैसे मिळतील हे ऑनलाइन समजेल.

sell old phone on cashify: मोबाइल कंपन्या दरदिवशी अत्याधुनिक फिचर्ससह नवनवे मॉडेल्स बाजारात आणतायेत. त्यामुळे तुमच्याकडील अगदी लेटेस्ट मोबाइलही सहा महिन्यात जुना वाटू शकतो. मग जुना फोन विकून नवा लेटेस्ट घेण्यासाठी अनेकजण गिऱ्हाईक शोधतात. मात्र, योग्य किंमत मिळत नाही. कॅशिफायवरून तुम्ही ऑनलाइन फोन विकू शकता. 

मोफत पिकअप

जर तुम्हाला जुना मोबाइल विकायचा असेल तर कुठेही जाण्याची गरज नाही. Cashify वरून तुम्ही घरबसल्या तुमचा जुना फोन विकू शकता. फोन पिक अप करण्यासाठी कंपनीकडून प्रतिनिधी तुमच्या घरी येईल. तुमच्या मोबाइलची किती किंमत मिळू शकते, हे तुम्हाला मोबाइल संबंधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन समजेल. तसेच जर तुम्हाला होम पिकअप पाहिजे नसेल तर तर तुम्ही कंपनी लोकेशनवर जाऊन फोन जमा करू शकता. 

जुन्या मोबाइलची किंमत कशी ठरवली जाते?

कॅशिफाय अ‍ॅपवर जाऊन सेल मोबाइल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही मोबाइलचा मॉडेल नंबर टाकून मोबाइलची माहिती भरू शकता. (sell old phone on cashify) यामध्ये स्क्रीन, स्पिकर, डिस्प्ले, माइक, हार्डवेअरसह इतर फिचर्स कसे काम करतात, ओरिजनल बिल, चार्जर आहे का? असे प्रश्न विचारले जातात. जर मोबाइलच्या एखाद्या फंक्शनमध्ये बिघाड असेल तर तसे नमूद करावे. संपूर्ण माहिती अपडेट केल्यानंतर तुम्हाला मोबाइलची जास्तीत जास्त विक्री किंमत दिसेल.  

जर ही किंमत तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही तुमचा पत्ता सबमिट करून ऑनलाइन पिकअपची ऑर्डर देऊ शकता. कॅशिफायचा प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन मोबाइल पिकअप करेल. त्यावेळीही मोबाइलची तपासणी होईल. जर मोबाइलची बॉडी, स्क्रिन डॅमेज असेल तर किंमत आणखी कमी होऊ शकते. जेव्हा फोन पिकअप केला जातो, त्यावेळी लगेच तुम्हाला पेमेंट केले जाते. 

पमेंटच्या बदल्यास गिफ्ट कूपन्सही घेऊ शकता?

जुना मोबाइल विकून जर तुम्हाला पैसे हवे नसतील तर तुम्ही अॅमेझॉन, क्रोमा अशा शॉपिंग साइटचे गिफ्ट व्हाउचरही घेऊ शकता. 2.5 टक्क्यांपर्यंत एक्ट्रा किंमत व्हाउचरद्वारे मिळू शकते. हे व्हाउचर तुम्ही ऑनलाइन खरेदीसाठी वापरू शकता. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, पुणे यासह इतरही आघाडीच्या शहरात कॅशिफायची सुविधा उपलब्ध आहे. 

अ‍ॅपवर इतर सुविधाही उपलब्ध

या अ‍ॅपवर तुम्ही जुना मोबाइल विकण्याबरोबर दुरूस्त केलेले जुने मोबाइल स्वस्तात खरेदी करू शकता. मोबाइल, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, गेमिंग कन्सोल, टीव्ही, कॅमेऱ्यासह इतरही गॅझेटची खरेदी विक्री करू शकता. मोबाइल दुरुस्तीची सुविधाही उपलब्ध आहे.