Savings Tips For Youth : आजची तरुण पिढी प्रचंड पैसे कमावतात आणि त्यांच्या लाइफस्टाईलवर पाहिजे तसा अतोनात खर्च करतात. आजच्या काळात अपडेटेड राहता यावे, यासाठी महागडे कपडे, कार, हॉलिडेज, महागड्या गॅझेट्सचा वापर करतात. परंतु, भविष्यातील एक सुरक्षा कवच म्हणून बचत कशी करावी? हे त्यांच्या लक्षात येत नाही. चांगले उत्पन्न मिळत राहात असले तरी, भविष्यात त्यांच्या खर्चामध्येही तशीच वाढ होणार असते. अशा वेळी बचत हा एकमेव असा मार्ग असतो, जो तुम्हाला सगळ्या परिस्थितीत सांभाळून घेतो. तेव्हा तरुणांनी कश्या प्रकारे बचत करावी? ते आज सविस्तरपणे आपण येथे जाणून घेणार आहोत.
ज्या तरुणांना भविष्यातील त्यांच्या वाढत्या उत्पन्नावर विश्वास आहे, ते बचत करण्याकडे फारसे लक्ष्य देत नाहीत. परंतु, उत्पन्न जास्त असो अथवा कमी प्रत्येकाने बचत ही करायला हवी. कारण, बचत करणे फार महत्वाचे आहे. अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या तरुणांसाठी बचत योजना कशी असावी? हे आज जाणून घेऊया.
Table of contents [Show]
तुमच्या उत्पन्नाचे तीन भाग करा
ज्या तरुणांना भविष्यात आपल्याला चांगलीच वेतनवाढ मिळणार आहे, असा विश्वास असेल, त्यांनी देखील बचत करणे गरजेचे आहे. कारण भविष्यात काय होणार हे कुणालाच माहिती नसते, हा धडा आपण सगळ्यांनीच कोरोना काळात घेतला. यासारख्या अनेक परिस्थिती भविष्यात निर्माण होवू शकतात. त्यामुळे तरुणांनी लवकरात लवकर बचत करायला सुरुवात करावी. तरुणांनी त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार बचत करावी. तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे तीन भाग करा, त्यात अती आवश्यक खर्च, महत्वाचा खर्च आणि किरकोळ खर्च या गोष्टींची समवेश असावा.
खर्चाचे विभाजन करा
तुम्ही आधी घर खर्च चालवण्याचा खर्च वेगळा करा. महिन्याला येणारा इतर खर्च, तुम्ही बाहेर करीत असलेला खाण्यापिण्याचा खर्च यांचा एक ताळमेळ करा, आणि बचतीचा एक भाग बाजूला काढा. आपण नोकरीला लागल्यानंतर बऱ्याचदा सुरुवातीच्या दिवसांमध्ये उत्पन्नाचा एक मोठा भाग आवश्यक खर्चांवर खर्च केल्या जातो. तेव्हा महत्वाचे खर्च करुन झाले की, लगेच बचत करायला लागा.
खर्चात कपात करणे आवश्यक
जगाचे अनुकरण करुन अगदी चांगली जीवनशैली जगायचे ठरविल्यास बचत होत नाही. बचत करण्यासाठी खर्चात कपात करणे आवश्यक असते. अनेकदा असे करणे आपल्याला अवघड वाटते. परंतु, जसजसे तुमचे उत्पन्न वाढते, तसतसा जीवनावश्यक खर्चाचा वाटा कमी होतो. तेव्हा उरलेला सगळा पैसा केवळ जीवनशैलीवर न खर्च करता, एक व्यवस्थित प्लॅन तयार करा.
तुमच्या अतिरिक्त बचत आणि गुंतवणुकीसाठी एक रोड मॅप तयार करा. वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे टाका. एका पेक्षा जास्त ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्याचा फायदाच होतो. तुम्ही इक्विटी फंड आणि म्युच्युअल फंड यासारख्या दीर्घकालीन गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. तसेच निवृत्तीनंतर तुम्ही बचत केलेला पैसा तुमच्या उपयोगी पडावा, यासाठी रिटायरमेंट सेविंग प्लॅन मध्ये देखील गुंतवणूक करु शकता. म्हातारपणात जेव्हा तुम्हाला खरोखरचं पैश्यांची गरज भासेल, त्या वेळेसाठी तुम्ही बचत करु शकता, कारण त्यावेळी तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही.