Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhaar link EPF via Umang : उमंग अ‍ॅपद्वारे ईपीएफ खात्याशी कसं लिंक करणार आधार कार्ड?

Aadhaar link EPF via Umang : उमंग अ‍ॅपद्वारे ईपीएफ खात्याशी कसं लिंक करणार आधार कार्ड?

Aadhaar link via Umang app : ईपीएफ खात्याशी आधार कार्ड लिंक करणं आता सोपं होणार आहे. ईपीएफ ही एक सरकारतर्फे चालवली जाणारी बचत योजना आहे. तर आधार कार्ड हे एक महत्त्वाचं दस्तावेज आहे. कोणत्याही सरकारी व्यवहारात अत्यंत महत्त्वाचं असं हे कार्ड आहे. तर आपल्या ईपीएफ खात्याची सर्व माहिती ठेवणारं अ‍ॅप म्हणजे उमंग अ‍ॅप.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund Organisation) किंवा ईपीएफ ही केंद्र सरकारच्या देखरेखीखाली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) सुरू केलेली बचत योजना आहे. नोकरदार कर्मचार्‍यांसाठी ईपीएफओची सुविधा निर्माण करण्यात आलीय. हे खातं कर्मचारी ज्या संस्थेत किंवा कंपनीत काम करतात त्यांच्यामार्फत ईपीएफओत उघडलं जातं. या खात्यात दोघांचंही योगदान असतं. कर्मचारी आणि कंपनीचा एक-एक हिस्सा असतो. तो निवृत्तीनंतर किंवा नोकरी बदलताना कर्मचाऱ्याला मिळू शकतो. सध्या ईपीएफमधल्या योगदानावरचा व्याज दर (Interest rate) 8.15 टक्के इतका आहे.

सुविधांचा लाभ मिळण्यासाठी...

ईपीएफ खातं आपण उघडल्यानंतर त्याचा खातेक्रमांक आपल्याला मिळतो. त्याला यूएएन म्हटलं जातं. ईपीएफओच्या माध्यमातून विविध सुविधा खातेधारकाला मिळत असतात. मात्र या सुविधांचा लाभ घेण्यासाठी यूएएनला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. सरकारमार्फत विविध बचत योजना त्याचप्रमाणं इतर शासकीय लाभ मिळवण्यासाठी आधार लिंक असणं अनिवार्यच करण्यात आलंय.

वन-स्टॉप अ‍ॅप्लिकेशन

आधार कार्डला उमंग अ‍ॅपच्या (Unified Mobile Application for New-age Governance) माध्यमातून जोडता येवू शकतं. या अ‍ॅपपची निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय (MeitY) आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (NeGD) यांनी केलीय. आयकर रिटर्न भरण्यासह इतर सर्व महत्त्वाच्या सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी हे अ‍ॅप म्हणजे वन-स्टॉप अ‍ॅप्लिकेशनच आहे. मात्र आधार कार्ड या अ‍ॅपशी कसं लिंक करायचं याबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. आपण विविध टप्प्यांच्या माध्यमातून ते कसं लिंक करता येईल, हे पाहू...

आधार कार्ड उमंग अ‍ॅपशी लिंक करण्यासाठीची प्रक्रिया पाहा - स्टेप बाय स्टेप

  1. तुमचा 'MPIN' किंवा OTP वापरून UMANG अ‍ॅपपमध्ये लॉग इन करावं
  2. लॉग इन केल्यानंतर, 'All services'  टॅबवर नेव्हिगेट करा आणि 'EPFO'निवडावं
  3. ईपीएफओ सेक्शनच्या अंतर्गत 'e-KYC services' निवडावी.
  4. 'e-KYC services' अंतर्गत 'Aadhaar Seeding' पर्याय निवडावा.
  5. तुमचा यूएएन एंटर करावा आणि ‘Get OTP’वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यासह तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी मिळेल.
  6. तुमच्या आधार कार्डासंबंधीची माहिती एंटर करावी. तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबइल नंबर आणि ई-मेल आयडीवर पुन्हा एक OTP मिळेल. 
  7. एकदा OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं आधार तुमच्या UAN शी लिंक केलं जाईल.

आधार क्रमांक ईपीएफ खात्याशी लिंक आहे की नाही, हे कसं ओळखावं?

  1. EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी – https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
  2. तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  3. मेंबर होमपेजवर पेजवर आधार डिटेल्स दिसतील
  4. तुमच्या आधार क्रमांकासमोर ‘व्हेरिफाईड (डेमोग्राफिक)’ लिहिलं असल्यास तुमचं आधार ईपीएफ खात्याशी जोडलं गेलं असल्याचं सिद्ध होतं.  UIDAIद्वारे ते व्हेरिफाइड केलं असल्याचंही स्पष्ट होतं.