Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Go Air Refund Status : रद्द झालेल्या गो एयर फ्लाईटचे रिफंड कसे मिळवाल, जाणून घ्या डीटेल्स…

Go Air Refund Status

Go First Airlines विमान कंपनीवर दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु आहे. कर्जाच्या बोझाखाली दबलेल्या कंपनीला त्यांचा रोजचा परिचालन खर्च भागवणे अवघड होऊन बसले आहे. मे महिन्यापासून कंपनीची उड्डाणे रद्द केली जात आहेत. विमान प्रवासासाठी आगाऊ तिकीट बुक करणाऱ्या नागरिकांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी कंपनीने स्वतंत्र पोर्टल सुरु केले आहे.

सध्या गो फर्स्ट (Go First Airlines) या विमान कंपनीवर दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु आहे. कर्जाच्या बोझाखाली दबलेल्या कंपनीला त्यांचा रोजचा परिचालन खर्च भागवणे अवघड होऊन बसले आहे. मे महिन्यापासून कंपनीची उड्डाणे रद्द केली जात आहेत. विमान प्रवासासाठी आगाऊ तिकीट बुक करणाऱ्या नागरिकांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी कंपनीने स्वतंत्र पोर्टल सुरु केले आहे.

तुम्ही देखील गो फर्स्टवरून विमान तिकीट बुक केले असेल आणि रद्द झालेल्या तिकिटाचे पैसे परत मिळवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी जरूर वाचा.

तिकिटाचा परतावा कसा मिळवायचा?

ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट काढले आहे त्यांना रिफंडसाठी खास सुरु केलेल्या पोर्टलवर http://gofirstclaims.in/claimsgofirstclaims.in/claims जावे लागेल. त्यावर जाऊन तिकीट धारकांनी लॉग ऑन करणे आवश्यक आहे. यानंतर पोर्टलवर विचारण्यात आलेली माहिती, तिकीट क्रमांक, पैशांचे व्यवहार कसे केले आधी माहिती द्यायची आहे.  यानंतर प्रवाशांना त्यांचे पैसे कधी परत केले जाईल याची माहिती देण्यात येईल. तसेच हे पैसे ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे माहिती देताना प्रवाशांनी कुठलीही चूक करू नये.

ही माहिती आहे महत्वाची 

आधीच सांगितल्याप्रमाणे हे पोर्टल केवळ रिफंड देण्याच्या उद्देशाने कंपनीने बनवले आहे. त्यामुळे रिफंडसाठीच या पोर्टलचा उपयोग करावा. पोर्टलवर जाऊन ग्राहकांना आधी त्यांचे खाते बनवावे लागेल. या खात्यासाठी प्रवाशांना त्यांचे नाव (जे नाव तिकीट बुक करताना लिहिले असेल ते), इमेल आयडी, मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. यानंतर प्रवासी युजर आयडी, पासवर्ड सेट करू शकतील. एकदा की पोर्टलवर खाते उघडले की त्यांनतर प्रवासी रिफंड साठी अर्ज करू शकतील. 

रिफंड फॉर्म कसा भराल?

एकदा की तुमचे खाते सुरु झाले की तुम्ही पोर्टलवर असणाऱ्या ‘रिफंड क्लेम’ वर क्लिक करून तिथे विचारलेली माहिती भरू शकता. याशिवाय तुम्हांला तुमच्या तिकीटाची पीडीएफ फाईल देखील अपलोड करायची आहे. एकदा की तुम्ही आवश्यक ती सर्व माहिती भरली की या फॉर्मची प्रिंट तुम्हांला काढावी लागेल आणि त्यावर सही करून पुन्हा हा फॉर्म पीडीएफ स्वरूपात पोर्टलवर अपलोड करायचे आहे.

तुमचा फॉर्म अपलोड केल्यानंतर तुमचे पैसे तुम्हांला कधी मिळतील हे देखील पोर्टलवर दाखवले जाईल आणि तुम्हांला मेल आणि मोबाईल एसएमएसद्वारे देखील कळविण्यात येईल.  

हेल्पलाईन जारी

ज्या प्रवाशांना रिफंड क्लेम करताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे अशा प्रवाशांना गी फर्स्ट एयरलाईन सहकार्य देखील करणार आहे. यासाठी कंपनीच्या feedback@flygofirst.com या इमेल आयडीवर तुम्ही मेल करू शकता किंवा 1800 2100 999 या क्रमांकावर संपर्क करू शकता.