Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home insurance : नैसर्गिक आपत्तीमुळे घराचं नुकसान? गृह विम्याचा पर्याय देईल दिलासा

Home insurance : नैसर्गिक आपत्तीमुळे घराचं नुकसान? गृह विम्याचा पर्याय देईल दिलासा

Earthquake damage : नैसर्गिक संकटांचा (Natural disaster) सामना करत असताना आपल्या मालमत्तांचं मोठं नुकसान होतं. त्यात भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती असेल तर प्रचंड हानी होते. यात जीवितहानीसह वित्तहानीचा धोकाही मोठा असतो. त्यामुळे अशा संकटांचा सामना करत असताना झालेली वित्तहानी भरून काढण्याचे विविध पर्याय आपल्यासमोर असतात. त्यातलाच एक म्हणजे गृह विमा...

भूकंपाचा झटका अन् आर्थिक फटका

मागच्या काही काळात देशातल्या अनेक भागांत भूकंपाचे झटके जाणवले. अलिकडेच दिल्ली आणि परिसराला भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. 21 मार्चला झालेल्या भूकंपामुळे अनेकांच्या घराला तडे गेले. कमकुवत बांधकामं कोसळली. त्यामुळे मोठा आर्थिक फटका सर्वसामान्यांना बसला. शिवाय भूकंप ही एक अनिश्चित घटना आहे. त्याचा अंदाज बांधणं कठीण असल्यानं अशावेळी गृह विमा (Home insurance) हा नुकसानभरपाईचा एकच पर्याय उरतो. भूकंपाचे विविध झोन असतात. यात धोकादायक, अतिधोकादायक असलेल्या ठिकाणी सर्वाधिक हानी होते. आपल्या देशात जवळपास 59 टक्के भूभाग भूकंपप्रवण असल्याचं कागदोपत्री नोंद आहे. आठ राज्ये त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशांमधली विविध शहर आणि गावं ही झोन पाचमध्ये येतात. या ठिकाणी अधिक तीव्रता असलेला भूकंप होण्याची शक्यता नेहमीच असते. देशतली पाच अशी झोन आहेत, जी अत्यंत धोकादायक आहेत. मोठी हानी करणारे आहे. त्यानंतर झोन चार, तीन, दोन याठिकाणी कमी धोका असल्याचं दिसून येतं.

अधिक संरक्षण देणाऱ्या विमा पर्यायाची निवड 

भूकंपामुळे जमीन हादरते. सहाजिकच त्यामुळे जमिनीवरच्या मालमत्ता नष्ट होतात. घर, गाड्या आणि इतर मालमत्तांचा यात समावेश आहे. अशा नैसर्गिक आपत्तीतून आपल्या घराचं रक्षण करायचं असेल तर विमा काढणं गरजेचं आहे. हा विमा किती कालावधीसाठी असावा हे बँक ठरवत असते. त्याचबरोबर संबंधित कंपनीवर तो अवलंबून असतो. हा गृह विमा आपल्याला आर्थिक नुकसानापासून संरक्षण देतो. हा विमा आपण बँक किंवा विमा कंपन्यांच्या मार्फतही काढू शकतो. ज्याप्रमाणं नुकसान झालेलं असेल, त्याप्रमाणात भरपाई मिळत असते. विम्याचे विविध पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात. त्यातल्या अधिक संरक्षण देणाऱ्या विमा पर्यायाची निवड करावी, जेणेकरून नुकसानभरपाई योग्य प्रमाणात मिळण्यास मदत होते.

गृहविम्यात काय-काय समाविष्ट?

  1. घराच्या आतल्या भागात झालेलं नुकसान
  2. घराच्या बाह्य भागाचं नुकसान 
  3. घरात असलेली रोख रक्कम हरवणं (चोरी, घरफोडी इ.)
  4. इलेक्ट्रिक उपकरणांमुळे झालेलं नुकसान
  5. घरातल्या पाळीव प्राण्यांमुळे झालेलं नुकसान
  6. वारसाहक्काच्या दागिन्यांचे आणि पुरातन वस्तूंचे नुकसान (पॉलिसी प्रस्ताव फॉर्ममध्ये घोषित नसलेले)
  7. तात्पुरतं स्थलांतर

मालमत्तेसह आणखी बरंच...

गृह विमा म्हणजे सर्वसमावेशक संरक्षण. यात केवळ मालमत्तेचंच नाही, तर मालमत्तेतल्या साहित्याचंही संरक्षण होतं. त्यामुळे प्रत्येक बाबीसाठी वेगळा असा विमा काढण्याची गरज उरत नाही. गृह विम्यांतर्गत वर नमूद केलेल्या बाबींचंही संरक्षण मिळतं. गृह विम्यासाठी घर तुमचं स्वत:चं असावं, असा काही नियम नाही. तुमच्या मालकीचं घर नसलं तरी घरातील साहित्य मात्र आपल्या मालकीचं असतं. त्याचं संरक्षण गरजेचं असतं. ते या माध्यमातून मिळत असतं. शिवाय घराबाहेर पडल्यानंतर कधीकधी घराच्या अथवा वाहनाच्या चाव्या हरवल्या तरी त्या गृह विम्यात समाविष्ट होतात.

ओळखा आपली गरज

गृह विमा कालावधी आणि रक्कम अशा पर्यायांमध्ये उपलब्ध असतो. त्यामुळे तो निवडताना आपला मासिक खर्च विचाराच घ्यावा लागतो. एखाद्याचं मासिक उत्पन्न जास्त असल्यास कमी कालावधी असलेला विमा हा चांगला पर्याय ठरू शकतो. कमी उत्पन्न असेल तर मात्र मोठ्या कालावधीचा पर्याय तुम्हाला निवडावा लागतो. साधारणपणे कर्जाची मुदत ही 30 वर्षे असते. यात वयाचा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. जर वय जास्त असेल तर कालावधी कमी अन् ईएमआय जास्त द्यावा लागतो. त्यामुळे किती प्रिमियम आपण भरू शकतो, याचा अंदाज आधीच बांधणं आवश्यक असतं.आपली आवश्यकता काय, हे एकदा लक्षात आलं, की त्यानुसार आपल्याला योग्य असणाऱ्या विमा पर्यायाची निवड करणं सोपं जातं. देशातल्या भूकंपप्रवण परिसरात राहणाऱ्यांनी आपल्या घराचा विमा काढायलाच हवा.