Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to do Saving: वायफळ खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'या' गोष्टी नक्की करा, सविस्तर वाचा

How to do Saving

How to do Saving: तुम्हाला भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करायचा नसेल, तर तुम्ही आजपासूनच वायफळ खर्च करणे बंद करा. हा खर्च बंद करण्यासाठी तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे गरजेचे आहे. हे नियोजन करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, जाणून घेऊयात.

आर्थिक अस्थिरतेपासून वाचण्यासाठी पैशांची बचत (Money Saving) करणे गरजेचे आहे. आज केलेली पैशांची बचत भविष्यात मोठ्या खर्चासाठी फायद्याची ठरू शकते. बऱ्याच वेळा आपण मोठ्या प्रमाणावर वायफळ खर्च करतो. हा खर्च आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून टाळता येऊ शकतो. मात्र हे आर्थिक नियोजन (Financial Planning) काटेकोर आणि शिस्तबद्द पद्धतीने पाळणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करायचे असेल आणि वायफळ खर्च टाळायचा असेल, तर तुम्ही खालील गोष्टी फॉलो करू शकता. या गोष्टींचे तंतोतंत पालन केले, तर तुमचाच फायदा होईल.

ऑटो-डेबिट सेव्हिंगची सुरुवात करा

बऱ्याच लोकांकडे पगार खाते (Salary Account) आणि बचत खाते (Saving Account) अशा दोन प्रकारचे बँक खाते असते. पगार खात्यात महिन्याला पैसे जमा होतात. या खात्यातील ठराविक रक्कम तुम्ही बचत खात्यात बचत स्वरूपात ऑटो-डेबिट (Auto-Debit) करायला हवी. बहुतांश लोक आजही खर्च झाल्यानंतर बचतीचा विचार करतात. मात्र तसे करण्याऐवजी प्रथम बचत आणि मग खर्च हा फॉर्म्युला वापरायला हवा. तुम्ही बँकेला दर महिन्याला ठराविक रक्कम ऑटो डेबिट करायला सांगू शकता. ही रक्कम बचत खात्यात सेव्हिंग केली जाईल. ज्यामुळे तुमची बचत ही होईल आणि वायफळ गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसेही उरणार नाहीत.

बजेट तयार करा

तुम्ही कोणताही खर्च करण्यापूर्वी तुमचे उत्पन्न आणि खर्च यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मासिक उत्पन्नातून  किती रुपये खर्च होतात हे लक्षात घ्या.  कोणत्या ठिकाणी तुम्हाला खर्च करणे गरजेचा आहे, त्या गोष्टींकडे सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्या. त्या गोष्टींसाठी एक निश्चित बजेट प्लॅन (Budget Plan) करा. आणि ठरवलेल्या बजेटमध्येच पैसे खर्च करा. जेणेकरून वायफळ खर्च होणार नाही.

कर्ज घेणे बंद करा

अनेकांना आजही असे वाटते की, बँकेकडून मोठ्या रकमेची घेतलेली उचल हीच कर्ज असते. हे जरी खरे असले, तरीही क्रेडिट कार्डवरून अवास्तव क्रेडिट लिमिटचा वापर करून केलेली शॉपिंग किंवा पैसे नसताना EMI स्वरूपात खरेदी केलेली गोष्ट देखील कर्जाच्याच आवाक्यात येते. कोणतीही गोष्ट खरेदी करताना उच्च व्याजदरावर ती खरेदी करू नका. यामुळे तुम्हाला अतिरिक्त व्याज तर भरावे लागतेच, सोबत तुमची बचतही टाळली जाते.

साधारण बचतीची रक्कम किती असावी?

बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, बचतीची रक्कम किती असावी? तर याचे उत्तर सोपे आहे. तुमच्या वर्तमान आणि भविष्यातील आर्थिक स्थितीला धक्का लागणार नाही इतकी तुमची बचत असावी. त्यासाठी दैनंदिन आधारावर किंवा मासिक आधारावर तुम्हाला बचत करायला हवी. भविष्यातील धोक्यांना लक्षात घेऊन इमर्जन्सी फंड, आरोग्य विमा, बेसिक सेव्हिंग आणि काही योजनांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुमच्या काही बचत योजना या शॉर्ट आणि लॉंग टर्म स्वरूपातील असायला हव्यात. इमर्जन्सी फंडात तुमच्या मासिक उत्पन्नाच्या किमान 6 पट रक्कम असायला हवी.

गुंतवणूक वाढवा

गुंतवणूक वाढवण्यासाठी सुरुवातीला बचत करणे गरजेचे आहे. बचत केल्यानंतर ही बचत योग्य ठिकाणी गुंतवून उत्तम परतावा मिळवता येतो. सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये शेअर्स, म्युच्युअल फंड, सरकारी योजना, बँक एफडी यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही सर्वाधिक परतावा मिळवू शकता. तसेच तुम्ही जितक्या पटीने खर्च कराल तितकीच बचत केली, तर तुम्हाला अधिक फायदा होईल.

Source: hindi.financialexpress.com