Money Management : बहुतांशी नोकरदार वर्ग हा आर्थिक शिस्तीकडे दुर्लक्ष करतो म्हणून महिना अखेर आली की हाती पैसाच शिल्लक राहत नाही. साहजिकच आहे महिना अखेरपर्यंत जर आपल्याला आपला पैसा पूरत नसेल तर गुंतवणूक तरी कशी करणार? पण जर आपण स्वत:ला आर्थिक शिस्त लावून घेतली तर आपल्याला हे जरूर शक्य आहे.
Table of contents [Show]
महिन्याचे बजेट आखणे
आपल्याला दर महिन्याला घरखर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, मनोरंजन आणि दैनंदिन प्रवासासाठी किती खर्च करायचा आहे. हे बजेट आखताना एखाद्या महिन्यामध्ये सणवार असेेल, आजारपण आले किंवा गावी नाहीतर सहलीसाठी जायचे असेल तर त्यांचे सुद्धा आगाऊ नियोजन केले तर त्याचा ही अंदाजे खर्च आपण बाजुला ठेवू शकतो. महिन्याचे बजेट बनवणे ही सगळ्यात चांगली आर्थिक व्यवस्थापनाची सवय असते. यामुळे आपल्याला आपल्या पगारातला एक मोठा हिस्सा द्यावा लागतो. त्यासाठी तो हिस्सा किती असावा व कोणत्या गोष्टीसाठी खर्च करावा हे प्राथमिकतेनुसार ठरवता येते. आपण आपल्या महिन्याच्या खर्चाचे जे बजेट ठरवतो त्यानुसार आपली राहणीमानाचा स्तर ही ठरत जातो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या महिन्याचे बजेट तयार करत नसाल तर आतापासुन त्याची सवय लावून घ्या.
आर्थिक उद्देश नजरेसमोर ठेवा
मुळात आपण आर्थिक व्यवस्थापन किंवा स्वत:ला आर्थिक शिस्त का लावतोय याचा उद्देश स्वत:ला स्पष्ट असला पाहिजे. जर आपल्याला एखादे घर, गाडी किंवा कोणतीही महागडी वस्तु खरेदी करायची असेल तर एका रात्रितुन पैसा उभा करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला सगळ्या बँकाकडून अवश्य कर्ज उपलब्ध होतील. मात्र,तथापि आपल्याकडे स्वत:चा निधी उपलब्ध असणं गरजेचं आहे. आपल्याला पुढच्या पाच वर्षात कोणतं स्वप्न पूर्ण करायचं आहे हे ठरवणं आणि मग त्यासाठी आतापासूनच बचतीच्या मार्गातून तयारी सुरू करणं आवश्यक आहे.
बचतीचा मार्ग अवलंबुन लवकर गुंतवणूक सुरू करा
कधी घरखर्चाला पैसे पूरत नाहित म्हणून तर कधी उधळपट्टीची सवय लागल्यामुळे आपण बचतीकडे दुर्लक्ष करतो. आपण जर मेडीक्लेम, जीवनविमा किंवा कर्जाची हफ्ते म्हणजेच गुंतवणूक करतो असा आपला समज असेल तर ते चुकीचं आहे. त्यांनी तुमचा पैसा वाढत नसतो. पैशांनी पैसा कमवून श्रीमंत व्हायचं असेल तर पैसा गुंतवण्याला विशेष महत्त्व दिलं पाहिजे. या गुंतवलेल्या पैशावर मिळणाऱ्या व्याजातून तुम्ही अनेक शिखरे पादाक्रांत करु शकता. यासाठी तुम्ही विविध सरकारी योजना, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू करु शकता.
आपत्कालिन निधीचं व्यवस्था करुन उधारी टाळा
आपल्याला आपल्या नातेवाईक वा मित्रपरिवारांकडून अडचणीच्या वेळी हात पसरावे लागतात. त्यांच्याकडून उसनवारीवर पैसे घ्यावे लागतात. ही वेळ आपल्यावर कधी येते जेव्हा आपल्यावर अचानक काही संकट येतं आणि आपल्याकडे त्यासाठी पुरेशा पैशांची व्यवस्था केलेली नसते. यासाठी अचानक उद्भवणाऱ्या या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे विशेष असा आप्तकालिन निधीचं नियोजन सुद्धा केलेलं असलं पाहिजे.
थोडक्यात वाढत्या पगारांच्या आकड्यानुसार आपले वैयक्तिक खर्च ही वाढवण्याऐवजी तो पैसा बचतीच्या मार्गातून गुंतवण्याला महत्त्व द्या.