Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PAN Card Application Status : पावती क्रमांकाशिवाय पॅन कार्ड अर्ज कसा तपासायचा? जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

PAN Card Application Status : पावती क्रमांकाशिवाय पॅन कार्ड अर्ज कसा तपासायचा? जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

PAN Card Application Status : पॅन कार्डमध्ये काही बदल हवे असल्यास अर्ज करावा लागतो. त्यासाठी सर्व तपशील सरकारी संकेतस्थळावर आपल्याला भरावा लागतो. मात्र या अर्जाची स्थिती जाणून घेताना आपल्याला दिलेला पावती क्रमांक (acknowledgement number) हरवला जातो किंवा आपण विसरतो. अशावेळी काय प्रक्रिया करावी, जेणेकरून या अर्जाची सद्यस्थिती आपल्याला माहीत होईल, यासंबंधीचं सविस्तर वृत्त पाहुया...

लिंकिंगची मुदत वाढवली, आता... 

पॅन कार्ड आता आधारला लिंक करणे गरजेचे आहेत. हे पॅन कार्ड आधारशी कसं लिंक (Aadhar-Pan Card Link) करावं, या प्रक्रियेची माहिती असायला हवी. पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत आता वाढवण्यात आलीय. आयकर विभागाने आधी 31 मार्च, 2022पर्यंत आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत दिली होती. त्यानंतर ती वाढवून आता 30 जून अशी करण्यात आलीय. दंडाची रक्कम कायम असली तरी वाढवलेल्या मुदतीत ही प्रक्रिया न केल्यास दंड दुप्पट होणार आहे. अनेकांनी आपलं पॅन कार्ड आधारशी काही कारणास्तव लिंक केलेलं नसेल. तुम्हाला तुमच्या पॅन कार्डमध्ये काही सुधारणा करणं आवश्यक आहे, मात्र त्या होत नाहीत. या कारणास्तवही अनेकांनी ते आधारशी लिंक केलेलं नसेल. या अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल म्हणजेच त्यातील काही माहितीत बदल करायचा असेल तर अधिकृत संकेतस्थळावर तो करण्याची सुविधा उपलब्ध आहे. एनएसडीएलच्या (National Securities Depository Limited) वेबसाइटवर जाऊन त्यासाठी अर्ज सबमिट करता येईल.

कशी तपासायची पॅन कार्ड अर्जाची स्थिती?

यूटीआयच्या पोर्टलवर पॅन कार्डची स्थिती तपासू शकता. यामध्ये यूटीआयआयटीएसएल पॅन पोर्टलवर pan.utiitsl.com किंवा TIN-NSDL one, TIN-NSDL PAN Portal — tin-nsdl.com यावर तपासता येवू शकतं. यासाठी तुमच्याकडे पावती क्रमांक असल्यास तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता. मात्र तुमचा पोचपावती क्रमांक उपलब्ध नसला तरीही तुम्ही त्याची स्थिती तपासू शकता. TIN-NSDL PAN Portal- tin-nsdl.com तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देतं.

पॅन कार्ड अर्जासंबंधी...

  • पावती क्रमांक नसताना पॅन कार्डचा अर्ज कसा तपासायचा, याची प्रक्रिया जाणून घेऊया. तुम्ही तुमचं नाव आणि जन्मतारीख टाकून तुमच्या पॅन कार्डची स्थिती तपासू शकता. यासाठी...
  • सर्वप्रथम TIN NSDL पोर्टल tin-nsdl.com वर लॉगिन करा.
  • अॅप्लिकेशन टाइम सेक्शनमध्ये जावं आणि PAN – New/Change Request हा ऑप्शन निवडावा.
  • आता पावती क्रमांक न टाकता, तुम्ही पॅन कार्ड स्थिती तपासण्यासाठी नावाच्या सेक्शनमध्ये जा.
  • तुमचे पहिले, आडनाव आणि मधले नाव टाका तसंच जन्मतारीख एंटर करा.
  • आता तुमच्या पॅन कार्ड अर्जाची स्थिती पाहण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.

फोनवरूनही जाणून घेता येईल अर्जाची स्थिती

अनेकांना संकेतस्थळावरून पॅन कार्ड अर्जाची स्थिती जाणून घेत असताना अडचणी येण्याची शक्यता असते. अशावेळी फोन कॉलद्वारे पॅन कार्ड अर्ज तपासण्याचीही सोय आहे. यासाठी तुम्हाला TINच्या कॉल सेंटरला कॉल करावा लागणार आहे. 020-27218080 या क्रमांकावर तुम्हाला कॉल करावा लागेल. या कॉलच्या दरम्यान तुम्हाला 15 अंकी पोचपावती क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड अर्जाची स्थिती देण्यात येईल.