Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vidya Lakshmi Portal: विद्या लक्ष्मी पोर्टलद्वारे एज्युकेशन लोनसाठी कसा अर्ज कराल? जाणून घ्या प्रक्रिया

Education Loan Scheme

एज्युकेशन लोनसाठी अप्लाय करताना गोंधळ उडत असेल तर विद्या लक्ष्मी पोर्टलची मदत घेऊ शकता. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सरकारद्वारे सुरू करण्यात आले आहे. विविध बँकांकडे एकाचवेळी तुम्ही अर्ज करू शकता. या पोर्टलवरून नोंदणी करून अर्ज कसा करायचा याची प्रक्रिया जाणून घ्या.

Vidya Lakshmi Portal: नामांकित विद्यापीठात शिक्षण घेण्याचं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असते. दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी युरोप, अमेरिका, कॅनडासह परदेशातील प्रसिद्ध विद्यापीठांत अर्ज करतात. (Education loan through vidya lakshmi portal) जे परदेशात जात नाहीत ते देशातीलच चांगल्या विद्यापीठात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतात. उच्च शिक्षण म्हटले तर जास्त पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे शैक्षणिक कर्जाचा सहारा अनेक  विद्यार्थी घेतात. मागील काही वर्षात शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे.

उच्च शिक्षण घेताना कर्जाची रक्कम काही लाखांत असते. त्यामुळे पालक आणि मुलांना ही प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडावी लागते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज सहजतेनं मिळावं यासाठी सरकारने विद्या लक्ष्मी पोर्टल (Vidya Lakshmi Portal) सुरू केले आहे. या पोर्टलबाबत अनेक विद्यार्थ्यांना माहिती नाही. (How to apply for education loan through vidya lakshmi portal) या पोर्टलद्वारे विद्यार्थी शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतो. देशातील आघाडीच्या बँका या पोर्टलशी जोडल्या गेल्या आहेत.

केंद्रीय अर्थ मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्या सहकार्याने या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. हे पोर्टल National Securities Depository Limited - NSDL द्वारे चालवले जाते.

विद्या लक्ष्मी पोर्टलद्वारे शैक्षणिक कर्जासाठी कसा अर्ज कराल?

विद्या लक्ष्मी पोर्टलवर विद्यार्थ्याला सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर Common Education Loan Application Form (CELAF) हा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थी विविध बँकांच्या एज्युकेशन लोन योजना पाहू शकतो, तसेच अप्लाय करू शकतो. कर्जाची गरज, पात्रता आणि सोईनुसार विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.  

internal-image-1-2.jpg

विद्यालक्ष्मी पोर्टलवरील अर्ज प्रक्रियेचा स्क्रीनशॉट

विद्या लक्ष्मी पोर्टलवर कोणत्या सुविधा मिळतात?

विविध बँकांच्या शैक्षणिक कर्ज योजनांची माहिती येथे मिळेल. तसेच एज्युकेशन लोनसाठी एकाच वेळी अनेक बँकांना अर्ज करता येईल. बँकांना लोनबाबत माहिती विचारता येईल तसेच काही तक्रार असेल तर पोर्टलद्वारे करता येईल. सरकारी स्कॉलरशीप पोर्टल विद्या लक्ष्मी पोर्टलशी जोडलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळेल. 

CELAF अर्जाचा उपयोग कशासाठी होतो?

या पोर्टलद्वारे विविध बँकांना कर्जासाठी अप्लाय करताना हा एकच अर्ज कामी येईल. प्रत्येक बँकेसाठी नवा फॉर्म भरण्याची गरज नाही. Indian Banks Association (IBA) ने या अर्जाला मान्यता दिली असून विद्यालक्ष्मी पोर्टलवर तो उपलब्ध आहे. 

कर्ज मंजूर झाले की नाही कसे कळेल?

एकदा तुम्ही पोर्टलवरून कर्जासाठी अप्लाय केल्यानंतर तुमच्या फॉर्मचे स्टेटस (स्थिती) बँकेद्वारे अपडेट केली जाईल. अॅप्लिकेशन डॅशबोर्डवर तुम्हाला ही माहिती मिळेल. जर तुमचा अर्ज नामंजूर झाला तर तुम्ही अधिक माहितीसाठी बँकेशी संपर्क साधू शकता. काही वेळा बँक तुमचा अर्ज होल्डवर सुद्धा ठेवू शकते. यामागचे कारण म्हणजे अतिरिक्त माहिती किंवा कागदपत्रे बँक कर्जदाराकडे मागते. या माहितीची पूर्तता केल्यानंतरच अर्जावर प्रक्रिया केली जाईल. 

एकावेळी किती बँकांना कर्जासाठी अर्ज करता येईल?

विद्या लक्ष्मी पोर्टलद्वारे विद्यार्थी एकावेळी तीन बँकांना शैक्षणिक कर्जासाठी अप्लाय करू शकतात.