Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Savings Tips: मजुरी करणाऱ्या पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी बचत कशी करावी?

Saving Tips

Savings Tips: मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा सांभाळ करणाऱ्यांनी या वाढत्या महागाईमध्ये आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बचत कशी करावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण त्यांचे उत्पन्न जेमतेम आहेत आणि खर्च खूप जास्त. काही बचत योजना आणि गुंतवणूक यांच्या माध्यमातून सुद्धा मुलांचे भविष्य सुरक्षित होऊ शकते ते कसे जाणून घेऊया.

Savings Tips: दहा वर्षाच्या आधीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये सर्वच क्षेत्रात बदल घडून आले. महागाई (inflation)वाढल्याने खर्च सुद्धा भरपूर होऊ लागले. उत्पन्नात सुद्धा वाढ झाली पण उत्पन्न आणि खर्च (Income and expenses) याचे प्रमाण जवळपास सारखेच झाले आहे. ही गोष्ट सर्व साधारण लोकांच्या बाबतीत जास्त लागु होते. मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा सांभाळ करणाऱ्यांनी या वाढत्या महागाईमध्ये आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बचत कशी करावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण त्यांचे उत्पन्न जेमतेम आहेत आणि खर्च खूप जास्त. काही बचत योजना आणि गुंतवणूक (investment) यांच्या माध्यमातून सुद्धा मुलांचे भविष्य सुरक्षित होऊ शकते ते कसे जाणून घेऊया. 

मुलांच्या शिक्षणासाठी निधी (Funding for Children's Education)

मूल जन्माला आल्यानंतर पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता लागते. मग तेव्हापासून सुद्धा तुम्ही त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकता. पोस्टाच्या अनेक योजनांमध्ये दर महिन्याला कमीत कमी गुंतवणूक करून काही वर्षातच तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. उदा. पोस्ट RD, यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावाने अकाऊंट ओपन करून त्यात दरमहा 100,200,500 ते 1000 पर्यंत पैसे भरू शकता. त्यावर एक ठराविक व्याजदर (Interest rate) दिलेला असतो. 5 ते 10 वर्षासाठी त्यात बचत करून उत्तम परतावा मिळवू शकता. 

दोन तीन योजनांमध्ये गुंतवणूक….. (Invest in two or three schemes….)

मुलांचे शिक्षण आणि त्यासोबतच त्यांचे लग्न ही सुद्धा मोठी जबाबदारी असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्ही मुलांच्या लग्नासाठी निधी जमा करू शकता. काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून जो परतावा मिळतो त्याची FD करू शकता. जय बँकेचा व्याजदर (Bank interest rate) जास्त आणि सुरक्षित असेल त्या बँक मध्ये FD करून तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित होऊ शकते. त्याचबरोबर 100, 200 रुपये महिन्याचे भरावे लागेल अशा योजनांमध्ये तुम्ही बचत करून चांगला परतावा घेऊ शकता. त्याच बरोबर जीवन विमा (Life insurance) हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. एकाच योजनेत इन्वेस्ट करून तुमचं निधी कमी होईल त्यामुळे थोडे थोडे पैसे वेगवेगळ्या योजनेत गुंतवून तुम्ही उत्तम परतावा घेऊ शकता. 

मुलांचे स्वप्न साकार होण्यास मदत….. (Help children's dreams come true)

प्रत्येक आईवडिलांचे आणि मुलांचे स्वप्न असते की, आपला मुलगा खूप शिकावा आणि मोठ्या पदावर जावा. याकरिता सध्या स्थितीमध्ये संघर्ष, मेहनत, चिकटी सोबतच पैसा सुद्धा महत्वाचा झाला आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना बचतीची सवय लावा. मजुरी करणाऱ्या महिलांना हप्ता भरल्यानंतर कामाचा मोबदला मिळतो. त्यांचा एक वार ठरलेला असतो. त्या दिवशी तुम्हाला मिळालेल्या पैशातून 100 रुपये वाचवून ठेवले तर  महिन्यातील 4 आठवडे म्हणजे तुमच्याकडे महिन्याला 400 रुपये वाचतील. ते पैसे एखाद्या योजनेत गुंतवा. यातून सुद्धा तुमच्या मुलांच्या भविष्यात हातभार लागेल.