Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Gram Suraksha Yojana: जाणून घ्या, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेबद्दल

Post Office Gram Suraksha Yojana

Image Source : www.facebook.com

Post Office Gram Suraksha Yojana: अलिकडच्या काळात पोस्ट ऑफिसच्या (Post office)आधुनिकीकरणामुळे लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. जर तुम्हाला जोखीममुक्त गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना तुमच्यासाठी खूप मोलाची आहे, या योजनेची काय वैशिष्टे आहेत ते जाऊन घेण्यासाठी वाचा हा लेख.

अलिकडच्या काळात पोस्ट ऑफिसच्या आधुनिकीकरणामुळे लोकांचा  विश्वास आणखी दृढ झाला आहे. जर तुम्हाला जोखीममुक्त गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा  योजना (Post Office Gram Suraksha Yojana) तुमच्यासाठी खूप मोलाची आहे. पोस्ट ऑफिसमध्ये ठेवलेला पैसा कधीच बुडत नाही आणि तिथे व्याज तुलनेने जास्त असते, असा सर्वसामान्य समज आहे. यामुळेच ग्रामीण किंवा निमशहरी भागातील गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक (Investment) करण्यास प्रथम प्राधान्य देतात. कारण कमी गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. त्यावर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. त्यामुळेच आजकाल अनेक लोक या आकर्षक योजनेकडे आकर्षित होत आहेत. तुम्हाला किंवा तुमच्या नॉमिनीला दररोज 50 रुपये किंवा महिन्याला 1500 रुपयांच्या गुंतवणुकीवर 35 लाख रुपये मिळू शकतात. 

60 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास.. 

गुंतवणूकदाराने 55 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 34.60 लाख रुपये मिळतील. त्याच बरोबर, गुंतवणूक करणारी व्यक्ती 80 वर्षांची झाल्यानंतर, ही रक्कम त्याला दिली जाते. दरम्यान, जर त्या व्यक्तीचा मृत्यू (death) झाला, तर संपूर्ण रक्कम त्याच्या नॉमिनीला (nominee) दिली जाते. त्याच वेळी, तुम्ही ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी ही योजना सरेंडर करू शकता, परंतु तुम्हाला त्याचा कोणताही लाभ मिळणार नाही.

प्रीमियम कसा भरावा? (How to Pay Premium) 

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत गुंतवणूकदार त्याचा प्रीमियम (Premium) दर महिन्याला, त्रैमासिक म्हणजे दर तीन महिन्यांनी, सहामाही म्हणजे प्रत्येक सहामाही किंवा वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा भरू शकतो.  गुंतवणूकदारांना प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांची सूट दिली जाईल. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत जीवन विमा सुविधा उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसमध्ये विविध योजना सुरू आहेत, त्यापैकी एक पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना आहे. ज्यामध्ये फक्त 1500 रुपये प्रति महिना गुंतवणूक केल्यास तुम्हाला 31 लाख ते 35 लाख रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. यासोबतच तुम्हाला या चालू पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत जीवन विम्याची सुविधा देखील मिळते.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणुकीचे फायदे (Benefits) 

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्ही कर्ज देखील मिळवू शकता. खरेदीच्या 4 वर्षानंतरच पॉलिसीवर कर्ज घेतले जाऊ शकते. तसेच, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान तुम्ही कधीही प्रीमियम भरणे चुकल्यास, तुम्ही प्रलंबित प्रीमियम रक्कम भरून ते पुन्हा सुरू करू शकता. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसशी देखील संपर्क साधू शकता. याशिवाय, ग्राम सुरक्षा योजनेची माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा. 

गुंतवणुकीवर चांगला परतावा 

पोस्ट ऑफिस बचत योजना तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा देते.  बरेच लोक शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात (Mutual funds)गुंतवणूक करतात, त्यामुळे अनेकांनी आता क्रिप्टोकरन्सीमध्येही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. पण या सर्व गुंतवणुकीत भरपूर जोखीम असते. यामध्ये परतावा केव्हा आणि किती मिळेल, हे निश्चित नाही. कारण यातील परतावा बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. पण पोस्ट ऑफिसची ही छोटी बचत योजना तुम्हाला प्रचंड परतावा देते. तेही वयाच्या शेवटच्या टप्प्यावर, जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्यावर अवलंबून असलेल्यांना त्याची खूप गरज असते. त्याचबरोबर त्यात तुमचे पैसे बुडण्याचा धोका नाही.