The journey of self-made billionaire women: नायका कंपनी (Nykaa) आणि कंपनीच्या फाऊंडर फाल्गुनी नायर सध्या खूप चर्चेत आलेले आहेत. गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी अज्ञान शेअरधारकाने ब्लॉक डीलमध्ये 1.42 कोटींचे 148.90 शेअर्स विकले, म्हणजे हे शेअर्स कंपनीच्या एकूण इक्विटीच्या 0.5 टक्के होते. हे शेअर्स विकल्यामुळे कंपनीचे स्टॉक 1.29 टक्क्यांनी घसरले. या खळबळजनक बातमीने शेअर बाजारासह सगळीकडे चर्चेला उधाण आले आहे. सोशल मिडियावर नायकाच्या शेअर बाजारातील जर्नीबद्दल बोलले जात आहे, कंपनीचे शेअर्स सतत घसरत असल्याबद्दल बोलले जात आहे, कंपनीची तुलना इतर कंपन्यांशी केली जात आहे, अशात कंपनी आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांना डगमगू न देता, त्यांना नफ्याच्या दिशेने घेऊन जात आहेत, कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर! या जागतील प्रभावशाली महिलांपैकी एक आहेत. तर देशातील अब्जाधीश महिला आहेत. त्यांच्याविषयीच्या रोचक गोष्टी जाणून घेऊयात.
नायकाच्या नायिका फाल्गुनी यांचा प्रवास (The journey of Falguni, the founder of Nykaa Company)
भारतातील सर्वात मोठ्या फॅशन रिटेल ब्रँडच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांचा जन्म, 19 फेब्रुवारी 1963 रोजी मुंबईत झाला. द न्यू एरा येथे त्यांनी शालेय शिक्षण घेतले. तर आयआय़म अहमदाबाद येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यान फाल्गुनी यांनी एएफ फर्ग्युसन अँड कंपनीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. कोटक महिंद्रा बँकेतही त्यांनी सुमारे 18 वर्षे काम केले. त्या कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. याशिवाय त्या कोटक सिक्युरिटीजमध्ये संचालकपदही भूषवले आहे.
फाल्गुनी यांनी 2012 मध्ये नायकाची (Nykaa) सुरुवात केली. एक सौंदर्य प्रसाधाने विकणारी कंपनी आहे. जेव्हा त्यांनी ही कंपनी सुरु केली, त्यावेळी सौंदर्य प्रसाधने विकणारा कोणताच ब्रँड उपलब्ध नव्हता. अनेकदा ऑनलाईन अॅग्रीगेटर वेबसाईट्सवर ब्रँडेड कंपन्यांच्या नावावर बनावट प्रोडक्ट विकले जात होते. अशावेळी, नायकाने योग्य मार्केटींग स्ट्रॅटेजी वापरुन, मार्केटमध्ये आपल्या कंपनीविषयी विश्वास निर्माण केला. त्यानंतर नायकाने स्वत:चे मिड प्राईज रेंजचे प्रोडक्ट बाजारात आणले ज्यामुळे नायकाला खूप मोठा मास ग्रुप ग्राहकांच्या रुपात मिळाला. मग नायकाने इतर फॅशन प्रोडक्टमध्ये उडी घेतली, यात कपडे, एक्सेसरीज, परफ्युम आदींची सुरुवात केली. आज त्यांचे 4 हजारहून अधिक प्रोडक्ट्स बाजारात आहेत. त्यात 1 हजार 500 हून अधिक ब्रँड प्रोफाईल्स आहेत. त्यांनी 2014 साली पहिले दुकान सुरु केले. आज 40 शहरांमध्ये 80 हून अधिक दुकाने मॉडर्नट्रेडमध्ये आहेत. कंपनीत 1 हजार 600 हून अधिक व्यक्ती काम करतात.
नायकाची सुरुवात झाल्यानंतर 10 वर्षांच्या आत, फाल्गुनी नायर यांनी कंपनीला अशा स्तरावर नेले आहे जिथे पोहोचण्यासाठी अनेक दशके लागतात. फाल्गुनी नायर यांचे यश हे अनेक बिझनेस आणि मॅनेजमेंट स्कूलमध्ये केस स्टडी म्हणून शिकवले जाऊ लागले आहे. एकदा फाल्गुनी नायर म्हणाल्या होत्या की, मी 50 व्या वर्षी कोणताही अनुभव न घेता नायकाला सुरुवात केली. माझा पती म्हणाला होता की मला आशा आहे की नायकाची कथा तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्या आयुष्यातील नायक किंवा नायिका बनण्यासाठी प्रेरित करेल. नायका (Nykaa) या कंपनीची 50 टक्के मालकी फाल्गुनी नायरकडे आहे. तर, स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रवेश करणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे, जिचे पूर्ण नेतृत्त्व एक महिला करत आहे.
फाल्गुनी यांचे नेटवर्थ 963 टक्क्यांनी वाढले (Falguni's net worth increased by 963 percent)
2022 मध्ये फाल्गुनी नायर यांनी बायोकॉनच्या किरण मुझुमदार शॉ यांना 57 हजार 520 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह मागे टाकले. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला म्हणून यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरुन लीडिंग वेल्थी वूमन लिस्ट 2021 मध्येही दुसरे स्थान मिळाले आहे. तर भारतातील 100 श्रीमंतांच्या यादीत 44 व्या स्थानी विराजमान झाल्या.
2021 मध्ये, स्टॉक एक्स्चेंजवर नायकाचे (Nykaa) जोरदार लिस्टींंग झाले. त्यानंतर कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ फाल्गुनी नायर यांची कॉर्पोरेट जगतात सर्वत्र चर्चा होऊ लागली. शेअर बाजारात नायकाच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला, मोठ्या प्रमाणात सबस्क्रिप्शन मिळाले. यामुळे फाल्गुनी नायरच्या संपत्तीत 963 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. त्यांना भारतातील सेल्फ मेड महिला अब्जाधीश म्हटले जाते.