Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Samruddhi Mahamarg Toll Tax: समृद्धी महामार्गावर किती टोल भरावा लागणार?

Samruddhi Mahamarg Toll Tax, Samruddhi Mahamarg Toll Charges

Image Source : www.brnl.in

Samruddhi Mahamarg Toll Tax: मुंबई आणि नागपूरला जोडणारा 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg)हा राज्य सरकारचा गेल्या काही वर्षांतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. येत्या काही दिवसात हा महामार्ग जनतेसाठी खुला होणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, समृद्धी महामार्गावर किती टोल भरावा लागणार? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Samruddhi Mahamarg Toll Tax: मुंबई आणि नागपूरला (Mumbai and Nagpur) जोडणारा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) हा राज्य सरकारचा गेल्या काही वर्षांतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. येत्या काही दिवसात हा महामार्ग जनतेसाठी खुला होणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.  मुंबई ते नागपूर हे 701 किलोमीटर अंतर कापण्यासाठी बांधण्यात आलेल्या महामार्गाच्या टोल (Highway tolls) दराबाबत अनेकजण वाद घालत होते, मात्र आता या नव्या महामार्गाचे अधिकृत ‘टोलरेट’ (Toll rate) समोर आले आहे. ते टोल रेट जाणून घेऊया. 

मुंबई ते नागपूर 1200 रुपये टोल….. Mumbai to Nagpur Toll

नामकरणापासून ते भूसंपादनापर्यंत 'हिंदुहृदयसम्राट' बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खूप चर्चेत आहे. आता या महामार्गावर टोल दराबाबत फलक लावण्यात आला असून त्याचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या फलकावर अवजड वाहनांपासून ते चारचाकी वाहनांपर्यंत प्रति किलोमीटर किती टोल आकारण्यात येणार आहे, याची माहिती देण्यात आली आहे. या फलकावर मुंबई ते नागपूर या 701 किलोमीटर अंतरासाठी चारचाकी वाहनांना प्रति किलोमीटर 1.73 पैसे आणि सुमारे 1200 रुपये मोजावे लागणार आहेत.  हे दर पुढील 3 वर्षांसाठी 31 मार्च 2025 पर्यंत कायम राहणार आहेत. 

कधी ओपन होणार समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg Open Date)

समृद्धी महामार्ग जानेवारी 2023 मध्ये ओपन करून आणि त्याचे उद्घाटन केले जाण्याची चर्चा आहे.  पहिला टप्पा (502 किमी) नागपूर-शिर्डीला (Nagpur-Shirdi) जोडेल. या ग्रीनफिल्ड प्रकल्पाची घोषणा पहिल्यांदा 2015 मध्ये करण्यात आली आणि जुलै 2017 मध्ये भूसंपादनाला सुरुवात झाली.

समृद्धी महामार्ग रूट (Samruddhi Mahamarg Route)

701 किमीचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे मधून जाईल.

समृद्धी महामार्ग टोल शुल्क (Samruddhi Mahamarg Toll Charges)

  • मोटार, जीप, व्हॅन किंवा हलकी मोटार वाहन 1.73 रुपये प्रति किमी. 
  • हलकी व्यावसायिक वाहने हलकी मालाची वाहने किंवा मिनी बसेस 2.79 रुपये प्रति किमीबस किंवा ट्रक 5.85 रुपये प्रति किमी. 
  • श्री-एक्सेल कमर्शियल व्हेईकल 6.38 रुपये प्रति किमी. 
  • जड बांधकाम मशिनरी, मल्टी एक्सल वाहने 9.18 रुपये प्रति किमी. 
  • हेवी ड्युटी वाहने (सात आसनी किंवा त्याहून अधिक) 11.17 रुपये प्रति किमी. 

मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या सहा तासांत….. 

डिसेंबर 2019 मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेनेने हा सरकारी प्रस्ताव मांडला होता, त्याला तत्कालीन मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या प्रस्तावानुसार या एक्स्प्रेस वेला 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग'  असे नावही देण्यात आले आहे. या 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या उभारणीमुळे मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या सहा तासांत कापता येणार असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) या महामार्गाला शिवसेना संस्थापकांचे (Founder of Shiv Sena) नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रातील योगदान लक्षात घेऊन महामार्गाला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले होते. ज्याला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी मान्यता दिली होती.