Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dhruv Rathee Net Worth : फेमस युट्युबर ध्रुव राठीची संपत्ती किती? जाणून घ्या

Dhruv Rathee

Dhruv Rathee ने सुरुवातीला भारतीय राजकारण आणि पक्षीय संबंध या विषयावर व्हिडियो बनवायला सुरुवात केली. सखोल विश्लेषण आणि सादरीकरण यामुळे फारच कमी कालावधीत तो नावारूपाला आला. Dhruv Rathee या चॅनलचे आज घडीला 13 मिलियन सबस्क्राईबर आहेत तर Dhruv Rathee Vlogs चे 2 मिलियन सबस्क्राईबर आहेत. वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीतून ध्रुव आता चांगली कमाई करू लागला आहे.

Dhruv Rathee हा युट्युबर तुम्हाला माहिती असेल. त्याचे व्हिडीओ अनेकदा ट्रेंड होत असतात. ध्रुवचे दोन युट्युब चॅनल आहेत. एक Dhruv Rathee या नावाने असून तिथे तो सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर सखोल विश्लेषण करत असतो. तर दुसरा युट्युब चॅनल आहे Dhruv Rathee Vlogs या नावाने. या चॅनलवर तो आणि त्याची बायको जुली (Juli Lbr) त्यांचे पर्यटन विषयक व्हिडियोज पोस्ट करत असतात. जुली ही एक जर्मन नागरिक असून मागच्याच वर्षी ध्रुव आणि जुलीने लग्न केले आहे.

सबस्क्राईबर किती? 

2013 पासून ध्रुवने युट्युब व्हिडियो बनवायला सुरुवात केली आहे. 2014 साली भारतात सार्वत्रिक निवडणूका सुरू असताना त्याने भारतीय राजकारण आणि पक्षीय संबंध या विषयावर व्हिडियो बनवायला सुरुवात केली. सखोल विश्लेषण आणि सादरीकरण यामुळे फारच कमी कालावधीत तो नावारूपाला आला. Dhruv Rathee या चॅनलचे आज घडीला 13 मिलियन सबस्क्राईबर आहेत तर Dhruv Rathee Vlogs चे 2 मिलियन सबस्क्राईबर आहेत. वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीतून ध्रुव आता चांगली कमाई करू लागला आहे.

ध्रुवने जर्मनीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून त्याने काही काळ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून देखील काम केले आहे.

संपत्ती किती? 

Youtuber. me या वेबसाईटच्या माहितीनुसार ध्रुव राठीकडे 3.4 दशलक्ष डॉलर्स इतकी संपत्ती आहे. त्याचा कमाईचा मुख्य स्त्रोत हा युट्युब आहे. तो महिन्याला जवळपास 48 लाख रुपये कमावतो.

मूळचा हरियाणा येथे रहिवासी असलेल्या ध्रुवचे कुटुंबीय रोहतक येथे राहतात. राठी कुटुंबियांचे तेथे घर, शेती देखील आहे.

महागड्या गाड्यांचे कलेक्शन 

ध्रुवला गाड्यांच्या देखील चांगला शौक आहे. ध्रुव त्याच्या व्हिडियोजमध्ये पर्यावरणाला प्राधान्य देताना दिसतो. तसेच तो इलेक्ट्रिक वाहनांचा देखील सपोर्टर आहे, त्याच्या फॉलोअर्सला देखील तो इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी आवाहन करत असतो. त्यांच्याकडे Tesla ची मॉडेल 3 कार आहे. या कारची किंमत अंदाजे 70 लाख रुपये इतकी आहे.

याशिवाय ध्रुवच्या ऑटोमोबाईल्स कलेक्शनमध्ये  रेंज रोव्हर P400e,  BMW 5 आणि मर्सिडीज-बेंझ GLC-क्लास देखील आहे. या सगळ्या गाड्यांची किंमत प्रत्येकी 70-80 लाख रुपये इतकी आहे.