Prize of the world's first battery powered watch: उन्हामुळे जमिनीवर पडणाऱ्या सावलीपासून वेळेचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आणि आज स्मार्टवॉचपर्यंत मानवाने प्रगती केली आहे. भारतात जयपूर येथील जंतर-मंतर येथे सूर्य किरणे आणि घड्याळाचे शास्त्र पाहायला मिळते. खरे तर वेळ मोजण्याचे तंत्र 5 हजार वर्षांपूर्वीपासून इजिप्त आणि इराकमधील बेबिलॉन साम्राज्यात अस्तित्त्वात होते, असे पुरातत्वशास्त्रीय पुरावे सांगतात.
मानवाने जगणे अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी, गरजेतून विविध शोध करत गेले. ज्यातून त्यांनी वेळेचे तंत्र शिकले. ते तंत्र सगळ्यांना सोप्प्या पद्धतीत समजावे किंवा थेट सोप्प्या रितीने वेळच समजावी यासाठी ते तंत्र वस्तुत रुपातंरीत करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न म्हणजे घड्याळ!
घड्याळ मग ते कोणतेही असो भिंतीवरचे, हातातले यात महत्त्वाचे असते ते क्वार्ट्ज पायझोइलेक्ट्रिक याचा शोध 1880 मध्ये जॅक आणि पियरे क्युरी यांनी लावला. याच शोधानंतर घड्याळ निर्मिती करणे शक्य झाले. बघता बघता घड्याळ क्षेत्रात क्रांती झाली. पुढे भिंतीवर लावण्याचे, टेबलवर ठेवण्याचे, गजर लावता येणारे घड्याळ, खिशात ठेवण्याचे, हातात घालण्याचे घड्याळ अशा प्रकारच्या घड्याळांची निर्मिती झाली. घड्याळ निर्मात्यांनी पेटंट घेतले, कंपन्या उभ्या राहिल्या, घड्याळ निर्मितीचे कारखाने उभे राहिले. यातून उद्योगनिर्मिती, रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. आज एवढी मोठी घड्याळ इंडस्ट्री जगात आहे. भारतात ब्रिटीश आणि पोर्तुगीजांमुळे 16 व्या शतकात घड्याळे आली. तसेच घड्याळ आणि त्यांचे महत्त्व जनतेमध्ये पोहोचण्यामागे तसेच घड्याळ तंत्र क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन देण्यामागे भारतीय राजा, जयपूरचे राजा सवाई जयसिंह यांचे खूप मोठे योगदान होते.
घड्याळ क्षेत्रात विविध शोध लागत लागत बॅटरीवर चालणार हातातले घड्याळ बनवण्यात आले, घड्याळ क्षेत्रातील ही महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. या हातातल्या घड्याळामुळे घड्याळ क्षेत्रात क्रांती झाली. आत्ताची सर्व मॉडर्न घड्याळे याच घड्याळाच्या तंत्रावर आधारलेली आहेत. या घड्याळाचा जन्म दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी अमेरिकेतील हेमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने केला. 1951 मध्ये कंपनीतील मुख्य संशोधक जॉन व्हॅन हॉर्न, भौतिकशास्त्रज्ञ फिलिप बेमिलर आणि तंत्रज्ञ जेम्स एच. रिस यांनी मिळून हे घड्याळ बनवले. त्यानंतर यावर अनेक प्रक्रिया करत एक एलिगंट वॉच बनवण्यात आले. अन्, 3 जानेवारी 1957 रोजी हे घड्याळ बाजारात विक्रीसाठी आणले गेले.
हेमिल्टन इलेक्ट्रिक कंपनीने हे घड्याळ मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये लाँच केले, त्याची पार्टी दिली ज्यात अमेरिकेतील बड्या हस्तींना बोलावण्यातआले होते. तब्बल 120 पत्रकारांनी हा इव्हेंट कव्हर केला होता. एकूणच ही घटना आणि घड्याळाची संपूर्ण जगभर चर्चा झाली होती. रेडिओ, वृत्तपत्र यांद्वारे बातम्या, जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या.
सुरुवातीला हेमिल्टन इलेक्ट्रिक कंपनीने हे घड्याळ पूर्णपणे सोन्यामध्ये बनवले होते. यामुळे याची किंमत त्यावेळी 175 युएस डॉलर होते, म्हणजे 14 हजार 507 रुपयांना होते. संपूर्ण सोन्यात मिळणारे हे घड्याळ एलिट क्लास व्यक्तींसाठी होते, ज्यांना उंची वस्तू खरेदी करण्याचा शौक होता. यानंतर घड्याळ सामान्य धातूची, लेदरची, व्हिगन लेदरची बनवू लागले ज्यामुळे घड्याळाच्या किंमती कमी झाल्या आणि घड्याळ सामान्य व्यक्ती वापरू लागले.