How much Buy Gold RBI : देशाचा संपूर्ण आर्थिक व्यवहार रिझर्व्ह बॅंक (Reserve Bank of India) च्या माध्यमातून चालते. आज याच बॅंकेने एक गुंतवणूक म्हणून देशाच्या भविष्यासाठी मागील दोन वर्षात किती सोने खरेदी केले आहेत? हे जाणून घेऊयात.
भारताने 2 वर्षात किती सोने विकत घेतले?
रिझर्व्ह बॅंकेने एप्रिल 2020 पासून ते सप्टेंबर 2022 कालावधीत या दोन वर्षात साधारण 132.34 टन सोने खरेदी केले आहे. जगात भारत हा सोने खरेदी करण्यामध्ये तिसरा क्रमाकांवर पोहोचला आहे. कारण भारताने 2022 मध्ये 17.46 टन सोने खरेदी केले आहे. मात्र भारतीय रिझर्व्ह बँक सप्टेंबर 2022पर्यंत गोल्ड रिझर्व्ह करण्याच्या बाबतीत 785.35 टनांसह 9 व्या स्थानावर पोहोचला. आरबीआयने 1 एप्रिल 2018 पासून ते 30 सप्टेंबर दरम्यान आपल्या सोन्याच्या साठ्यात 225.03 टन वाढ केली. सप्टेंबर तिमाहीत केंद्रीय बँकांनी 400 टनांपेक्षा जास्त सोने विकत घेतले, ते 1 वर्षाच्या तुलनेत 4 पट आहे. आरबीआयने 1 एप्रिल 2018 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान एकूण 225.03 टन सोने खरेदी केली आहे.
जगातील बँका सोने का खरेदी करतात?
जगभरातील केंद्रीय बँका डॉलरच्या जबरदस्त ताकदीनंतर सोन्याची खरेदी करत आहेत. रिझव्र्ह बँकेसह जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोने खरेदी करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महागाईला तोंड देण्याची ही तयारी म्हणण्यात येईल. जेव्हा महागाई वाढते तेव्हा चलनाचे मूल्य कमी होऊ लागते. याशिवाय अनिश्चिततेच्या काळातही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोन्याचा साठा राखीव ठेवला जातो.