PPF Account Extension: नोकरदार आणि पगारदार व्यक्ती दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुतंवणूक करतात. यामध्ये पीपीएफ योजनेला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येते. या गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षांचा असून, यावर 7.1 टक्के परतावा मिळतो. तसेच गुंतवणूकदाराला यामध्ये इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत 1.50 लाखापर्यंत सवलत मिळते.
Table of contents [Show]
5-5 वर्षांनी खात्याची मुदत वाढवण्याचा पर्याय
पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षांपुरताच आहे. पण एखाद्याला 15 वर्षानंतरही हे खाते सुरू ठेवायचे असतील तर तसा पर्याय उपलब्ध नाही. पण गुंतवणूकदार पहिली 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मात्र पुढील 5 वर्षासाठी ही योजना पुढे सुरू ठेवू शकतो. अशाप्रकारे 5-5 वर्षांच्या गुंतवणुकीसह या खात्याची मुदत वाढवता येते.
कालावधी वाढवण्याचे दोन पर्याय उपलब्ध
पीपीएफ खात्याची 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदार या खात्याची मुदत 5 वर्षांसाठी दोन पर्यायांद्वारे वाढवू शकतो. पहिला पर्याय म्हणजे या खात्यामध्ये आणखी पैसे जमा करून कालावधी वाढवता येतो आणि दुसऱ्या पर्यायातून नव्याने पैसे न बरता आहे तेवढ्या रकमेसह फक्त खात्याचा कालावधी वाढवता येतो. या दोन्ही पर्यायांचा वापर करण्यासाठी बँकेत किंवा पोस्टात अर्ज करावा लागतो. पण या दोन्ही पर्यायांपैकी एकाही पर्यायाचा गुंतवणूकदाराने वापर केला नाही तर, खात्यात जमा झालेल्या रकमेवर गुंतवणूकदाराला व्याज मिळत राहते. जोपर्यंत खात्यातून पैसे काढत नाही. तोपर्यंत त्यावर व्याज मिळतं.
पीपीएफ खाते कोण काढू शकतं?
- भारतीय नागरिक पीपीएफ खाते उघडू शकतात.
- अनिवासी भारतीयसुद्धा (NRI) पीपीएफ खाते उघडू शकतो.
- एका व्यक्तीला एकच पीपीएफ खाते उघडता येते.
- भारतीयांनी पीपीएफ खात्याची मुदत वाढवता येते.
- अनिवासी भारतीयांना पीपीएफ खात्यासाठी फक्त 15 वर्षांचा कालावधी मिळतो.
- अल्पवयीन मुलाचेही पीपीएफ खाते उघडता येते.
पीपीएफ खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पॅनकार्ड
- आधारकार्ड
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- इलेक्ट्रिसिटी बिल
- पासपोर्टसाईज फोटो
- अल्पवयीन मुलांसाठी जन्माचा दाखला
पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही केंद्र सरकारद्वारे राबविली जाणारी गुंतवणूक योजना आहे. ही योजना पूर्णत: जोखीममुक्त गुंतवणूक आहे. या योजनेवर गुंतवणूकदारा प्रत्येक वर्षी 1.50 लाखापर्यंत कर सवलत मिळते. तसेच खाते सुरू केल्यानंतर 7 वर्षांनी यातून पैसे काढता येतात. तसेच आर्थिक संकटात यावर कर्जही मिळते. हे खाते नियमित सुरू राहण्यासाठी प्रत्येक वर्षी यात किमान 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे. पोस्टात (PPF Account in Post Office) आणि बँकेत पीपीएफ खाते सुरू करता येते.