Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF Account in Post Office: पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते कसे सुरू करायचे?

PPF Account in Post Office

Image Source : www.twitter.com/g20org

PPF Account in Post Office: पोस्ट ऑफिसतर्फे विविध प्रकारची खाती सुरू करता येतात. आज आपण पोस्टात पीपीएफ खाते कसे सुरू करायचे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

भारतातील पोस्ट ऑफिस विभागातर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा नागरिकांना पुरवल्या जातात. यात प्रामुख्याने पोस्ट ऑफिसद्वारे पोस्ट स्टॅम्प वितरित करणे, पत्र-कुरिअर पाठवणे, पार्सल सेवा आणि त्याचबरोबर काही गुंतवणुकीच्या योजनाही राबवल्या जातात. पोस्ट ऑफिस ही यंत्रणा पूर्णपणे सरकारतर्फे चालवली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांचा पोस्टाच्या यंत्रणेवर गेल्या कित्येक वर्षापासून विश्वास आहे.

पोस्ट ऑफिसतर्फे विविध प्रकारच्या योजनांसोबत पीपीएफ (पब्लिक प्रोव्हिडंट फंड) ही गुंतवणूक योजनासुद्धा राबवली जाते. आज आपण पोस्टामध्ये पीपीएफ खाते कसे सुरू करायचे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण पीपीएफ खाते म्हणजे काय? ते समजून घेऊ.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF)

पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही एक दीर्घकालीन सरकारी गुंतवणूक योजना आहे. 1968 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. एका ठराविक टक्क्यांचा परतावा मिळवून देणारी ही योजना बचत आणि गुंतवणूक असे दोन्ही उद्देश पूर्ण करत असल्याने याची लोकप्रियता वाढली होती. या योजनेवरील व्याजदराचा आढावा दर तीन महिन्यांनी सरकारतर्फे घेतला जातो. तसेच पीपीएफ खात्यामध्ये जमा होणारी रक्कम ही टॅक्स-फ्री असते.

पीपीएफ खात्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये

पीपीएफ खात्याचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट्य म्हणजे, या खात्यामध्ये गुंतवणूकदार किमान 500 रुपयांपासून ते 1.50 लाखापर्यंतची गुंतवणूक एका आर्थिक वर्षात करू शकतात. ही गुंतवणूक एकत्रित किंवा प्रत्येक महिन्याला ठराविक रकमेसह करता येते.

पीपीएफ खात्यामध्ये जमा होणारी रक्कम ही 15 वर्षांसाठी लॉक होते. त्यापूर्वी या खात्यातून पैसे काढता येत नाहीत. त्याचबरोबर 15 वर्षांची मुदत संपल्यावर गुंतवणूकदाराला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ देण्याची सुविधा या योजनेमध्ये आहे.

खाते सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षात त्यात किमान रक्कम जमा होणे गरजेचे आहे. अन्यथा खाते निष्क्रिय किंवा फ्रीज होऊ शकते.

दीर्घकाळासाठी गुंतवणूक आणि कोणतीही जोखीम स्वीकारण्यास तयार नसणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्यावर सध्या गुंतवणूकदारांना 7.1 टक्के व्याज देत आहे.

ऑफलाईन खाते असे ओपन करा

तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा राष्ट्रीय / खाजगी बँकांमध्ये जाऊन पीपीएफ खाते सुरू करू शकता. स्टेट बँकेसह, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक आदी बँकांमध्ये पीपीएफ खाते सुरू करता येते. प्रत्यक्ष बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते सुरू करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पीपीएफ खाते सुरू करण्यासाठी लागणारा अर्ज भरा.

फॉर्मवरील माहिती भरून, त्यावर तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावा. तसेच सोबत केवायसीसाठी लागणारी कागदपत्रे जोडा.

पीपीएफ खाते सुरू करण्यासाठी सर्वप्रथम 100 रुपये भरणे आवश्यक आहे. त्यानंतर पहिल्या वर्षात 70 हजार आणि त्यानंतर 1.50 लाखापर्यंत रक्कम भरता येते.

खाते सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर तुमचे खाते सुरू होते. त्यासोबत पोस्ट ऑफिस पासबुक देते. ज्याद्वारे गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीचा ट्रॅक ठेवू शकतात.

ऑनलाईन पीपीएफ खाते ओपन करा

पोस्ट ऑफिसद्वारे विविध सेवा ऑनलाईन देण्यास सुरूवात झाली आहे. पण अजूनही पोस्टामध्ये पीपीएफ खाते ऑनलाईन सुरू करता येत नाही. पण तुम्ही इंटरनेट बँकिंगच्या मदतीने नक्कीच पीपीएफ खाते ऑनलाईन सुरू करू शकता.

सर्वप्रथम इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग लॉगिन करा.

ओपन पीपीएफ अकाउंट यावर क्लिक करा.

ओपन झालेल्या फॉर्मवरील सर्व आवश्यक माहिती भरा.

प्रत्येक वर्षाला किती रक्कम भरू शकता, ती रक्कम नमूद करा.

सर्व माहितीसह भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल. 

ओटीपी व्हेरिफाय केला की पीपीएफ खाते तयार.