Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card वापरकर्त्याचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कशी केली जाते?

Credit card

Credit Card: क्रेडिट कार्डचे फायदे कितीही असले तरीही हे एक प्रकारचे कर्ज आहे ते वेळेवर न भरल्याने दंड, व्याज हे भरावेच लागते.

Credit Card: आजकाल आपल्या सगळ्यांकडेच क्रेडिट कार्ड(Credit Card) आहे. लोक याचा वापर करुन पैसे नसताना ही वस्तू खरेदी करतात आणि नंतर त्याचे पैसे पुन्हा बँकेमध्ये(Bank) भरतात. यामुळे अनेकांचं आयुष्य थोडं सोप झालं आहे. प्रत्येक व्यक्तीची क्रेडिट कार्डची मर्यादा(Credit Card Limit) वेगवेगळी असते. क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तरंच तुम्हाला याचा फायदा होईल अन्यथा त्याच्या कर्जामध्ये(Loan) इतके बुडाल की मग यातून बाहेर निघणं अवधड होऊन जाईल. क्रेडिट कार्डचे फायदे कितीही असले तरीही हे एक प्रकारचे कर्ज आहे ते वेळेवर न भरल्याने दंड, व्याज(Interest) हे भरावेच लागते. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का?  क्रेडिट कार्ड वापरत्याकर्त्याचा मृत्यू झाला तर त्याने  घेतलेल्या कर्जाचं काय होतं? ही थकबाकी परत करण्याची जबाबदारी कोणाची असते? ती माफ केली जाते का? चला याची उत्तर जाणून घेऊयात.

वापरकर्त्याच्या पश्चात काय?

क्रेडिट कार्डेच्या(Credit Card) आधारे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही जमीन(Land), एफडी(FD) किंवा तुमची कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही. यामध्ये अर्जदाराचे उत्पन्न(Income), क्रेडिट स्कोअर(Credit Score), विद्यमान कर्ज(Loan) आणि परतफेडीचा इतिहास इत्यादींच्या आधारे कार्डची क्रेडिट मर्यादा निश्चित करण्यात येते. क्रेडिट कार्डद्वारे खर्च केलेल्या रकमेची परतफेड करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी क्रेडिट कार्डधारकाची असते. पण जर क्रेडिट कार्ड वापरकर्त्याचा घेतलेली रक्कम परत करण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर बँक कर्जाची थकबाकी राइट ऑफ(right off) करते. थोडक्यात सांगायचे तर अशा परिस्थितीत कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला थकबाकी भरण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.

सुरक्षित क्रेडिट कार्ड किंवा एफडीवर क्रेडिट कार्ड घेतले असल्यास?

आजकाल अनेक सुरक्षित क्रेडिट कार्ड देखील उपलब्ध झाली आहेत. सध्या बऱ्याच जणांकडे सुरक्षित क्रेडिट कार्ड आहेत. सुरक्षित क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी एफडी(FD) बनवावी लागते आणि त्यावर कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अशा केसमध्ये जर क्रेडिट कार्ड वापरत्याकर्त्याने पैसे दिले नाहीत किंवा त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर बँकेला त्याची एफडी एनकॅश(Encash) करून त्याचे कर्ज वसूल करण्याचा अधिकार असतो.

वैयक्तिक कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय होते?

वैयक्तिक कर्ज(Personal Loan) देखील असुरक्षित कर्जाच्या श्रेणीतच येते. क्रेडिट कार्डप्रमाणे वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारीही कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची असते.परंतु जर त्याचा मृत्यू झाला तर, बँक त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कर्जाची परतफेड करण्यास भाग पाडू शकत नाही. अशा स्थितीत कर्जही त्याच्या मृत्यू सोबतच संपते.